सन्मान लेकीचा!
गावाची लेक अधिकारी झाली
गावाला मोठा अभिमान वाटला..
तिच्या स्वागतासाठी इथं
माणसाला माणूस दाटला..
घरची परिस्थिती बघितली तर
एकदम साधी पण शिक्षणाचे महत्त्व तिनं
जाणलं सगळ्यात आधी..
प्रतिकूल परिस्थितीच तीन
कधीच भांडवल नाही केलं,
कष्टाने आणि जिद्दीने
स्वप्न पूर्णत्वास नेले..
न कुठले प्रसिद्ध क्लास
ना कुठलं अवसान उसनं,
अभ्यास आणि अभ्यासावरच
लक्ष होतं तिचं तिक्ष्ण..
नका मांडू पोरांनो
तुम्ही पण कसल्याच व्यथा,
डोळ्यासमोर राहू द्या
मोठा मोठ्या यशोगाथा..
फौजदार झाली बघा
आज आपली मनीषाताई
धन्य झाले तिचे
बाबा आणि आई
बाबा आणि आई…
– संजय शेळके, पांढरी
मो.99752 28585