धाडस दाखवत माय लेकरांची भेट घडवून आणली
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील पांडुरंग घोडके यांची डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नऊ परस विहिरीत एक लहान बिबट्या पडलेले होते ते सायंकाळी चार वाजता मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना डरकाळीचा आवाज विहीरीतून ऐकू आले, या घटनेची माहिती वनविभागाला कळवले वनविभागाचाचे कर्मचारी आणि कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे हे आपल्या सहकारी राजु भोजने,शैलेश मिश्रा यांना घेत रात्री आठ वाजता घटनास्थळी गेले,तब्बल नऊ परस या विहिरीत हा बिबट्या एका कपारीवर दडून बसले होते प्राणीमित्र नितीन आळकुटे हे रात्री जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने खाली उतरले बिबट्या चे हावभाव अंदाज घेत दहा मिनिटांतच त्याला पकडून सुरक्षित पणे पिंजऱ्यात टाकून वर काढले, या वेळी वनविभागाचे अधिकारी शाम सिरसाठ वनकर्मचारी विधाते, काळे ,शेख,इतर व सुलेमान देवळा ग्रामस्थांनी मदत केली,
आठ नऊ महिन्यांचा हा बिबट्या होता, भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्या ला खायला दिले गेले, बिबट्या तिच्या पिल्लासाठी येणार हे निश्चित होते रात्री अकरा वाजता बिबट्या व एक पिल्लू सोबत विहिर परिसरात चकरा मारताना दिसताच सर्वाची धावपळ उडाली परिसरात तात्काळ पिंजरा दार उघडून ठेवले बछडा डरकाळी देताच मुक्या माय लेकराची भेट झाली या बिबट्या म्हटलं की अनेकांना भीती वाटते पण आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता…
* विहिरीना सुरक्षित कठडे करणे गरजेचे
- मागील आठ दिवसांत एक कोल्हा दोन बिबट्या बाहेर काढले आहेत. काढले आहेत असे अनेक वन्यजीव पडक्या व कठडे नसलेल्या विहिरीत पडतात असे धोकादायक विहिरीना सुरक्षित कठडे करणे गरजेचे आहे.- प्राणीमित्र नितीन आळकुटे