ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – दादा धनवडे
पाटोदा / प्रतिनिधी
आमदार सुरेश आण्णा धस यांचे समर्थक भाजपाचे ज्येष्ठ नेते अंमळनेर सर्कलचे भाग्यविधाते भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या आज होत असलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी अंमळनेर सर्कल मधील जनतेने मोठ्या संख्येने मुगगाव येथे संध्याकाळी उपस्थित रहावे अशी आव्हान दादा धनवडे यांनी केले आहे.
पाटोदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमदार सुरेश आण्णा धस यांचे समर्थक भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या सामाजिक कार्याची चळवळ अखंडपणे सुरू आहे त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामामुळे मोठी सामाजिक राजकीय धार्मिक सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली फळी तयार केली आहे यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे भवर अण्णा सर्वांच्या मनामध्ये घर करून बसले आहेत त्यांच्या कार्यामुळे सर्वांनाच ते आपल्या आणि हक्काचे वाटतात आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मुगगाव येथे मोठ्या थाटामध्ये संपन्न होणार असल्याने सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान दादा धनवडे यांनी केले आहे.