शाळेवर फिरवले पाणी ; शाळेच्या जागेत जलजिवनच्या टाकीचे काम!
फेरसर्व्हे करून व्यापक स्वरूपात योजना राबवा : ग्रामस्थांचे उपोषण
बीड | प्रतिनिधी
तालुक्यातील छत्रबोरगाव येथे ग्रामीण जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम जिल्हा परिषद प्रथामिक शाळेच्या जागेत होत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे तसेच या योजनेचा फेर सर्व्हे करून व्यापक स्वरूपात योजना राबवावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.
जिपच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रबोरगाव येथे ग्रामीण जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम जिल्हा परिषद प्रथामिक शाळेच्या जागेत होत आहे. शाळेच्या जागेत पूर्वीच्या दोन जुन्या पाण्याच्या टाक्या आहेत आता नविन टाकी उभारण्यात येत असल्याने शाळेला व मैदान अपूरे पडत आहे. संबंधित गुत्तेदार, अभियंता यांना तोंडी चर्चा करून व कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली परंतु त्यांनी दखल घेत नाही व ग्रामसेवकांना माहिती विचारल्यास त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या योजनेचा फेर सर्व्हे करून लोकसंख्येनुसार सर्व्हे करून ही योजना आज रोजीच्या लोकसंख्येप्रमाणे व भविष्यातील गावाच्या लोकसंख्या वाढीचा विचार करून राबविण्यात यावी. सध्या गावातील पाईपलाईन व नळातुन दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. या योजनाचा फायदा ग्रामस्थांना होत नसल्याने ही योजना स्थगित करून या योजनेचा फेरसर्व्हे करून पुनःप्रस्ताव दाखल करण्याचा यावा व सध्या चाललू असलेल्या शाळेच्य हद्दीतील पाण्याच्या टाकीचे बांधकाम रद्द करून ग्रामपंचायतीच्या हद्दीत करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ज्ञानेश्वर जाधव, वचिष्ठ लांडगे, विठ्ठल जाधव, रामेश्वर जाधव, श्रीराम शेवाळे यांनी उपोषण सुरू केले आहे.