- फौजदारी कारवाईसाठी जलसमाधी आंदोलन – डॉ.गणेश ढवळे
बीड | प्रतिनिधी
दि.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड चौसाळा शाखेतील मौजे. गोलंग्री व मौजे. कानडीघाट ता.जि.बीड येथील मयत शेतक-यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर चौसाळा शाखेतील आधिकारी व कर्मचारी व दलालांनी संगनमतानेच उचलून आर्थिक फसवणूक केल्याबद्दल संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड, मुख्य कार्यकारी आधिकारी दि.बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि.बीड, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच मयतांच्या खात्यावरील रक्कम त्यांच्या वारसांना तात्काळ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.०५ जुलै २०२३ वार बुधवार रोजी बीड तालुक्यातील मौजे.गोलंग्री येथील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी शरद ठोंबरे,लेखा परीक्षक सानप, तपासनीस सर्वज्ञ, उपव्यवस्थापक उबाळे, नेकनुर डीएसबीचे पो.ना.ढाकणे, पुंडे,पो.हे.घुले, डोंगरे,मुरुमकर, बळवंत ढाकणे यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात विजय झोडगे. त्रिंबक झोडगे, शांताबाई झोडगे,मुक्ताबाई झोडगे, रेवण झोडगे, रोहिदास कुटे, चक्रधर झोडगे, अशोक कुडके, संभाजी झोडगे, बाबासाहेब झोडगे,संदिपान झोडगे, नितिन कवडे, श्रीकांत कवडे आदि.सहभागी होते.
दि.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड मुख्य शाखेच्या चौसाळा शाखेत मोठ्याप्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून आधिकारी कर्मचारी व बँकेतील दलाल यांनी संगनमतानेच मौजे. कानडीघाट ता.जि.बीड येथील मयत शेतक-यांच्या खात्यातील लाखो रूपये रक्कम परस्पर गायब प्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि शेतक-यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर गायब रक्कम त्यांच्या वारसांना देण्यात यावी यासाठी निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड, मुख्य कार्यकारी आधिकारी दि.बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि.बीड व जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था चौकशीच्या नावाखाली जाणीवपुर्वक फौजदारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच मयत शेतक-यांच्या खात्यावरील उचललेली रक्कम वारसांना त्वरीत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.