आ.धस अण्णांचा सच्चा शिलेदार : भाऊसाहेब भवर
मैत्री असावी ती हक्काची…मैत्री असावी ती आपुलकीची…मैत्री असावी ती नात्यापलीकडची…मैत्री टिकावी कायमची…अन् मैत्री असावी तर आ. सुरेश धस आणि भाऊसाहेब भवर यांच्या यांच्यासारखे…
कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही किंवा होत नाही यामागे संघर्ष, कष्ट, सहनशीलता, नम्रपणा, जिद्द, चिकाटी, विश्वास सर्व गोष्टी येतात त्यात सर्व गोष्टी आष्टी मतदारसंघाचे भाग्यविधाते आ.सुरेश आण्णा धस यांचा सच्चा शिलेदार भाऊसाहेब अण्णा भवर यांच्यामध्ये दिसून येते.. भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्यावर लेखणीतून टाकलेला प्रकाश….
6 जुलै रोजी आ.सुरेश आण्णा धस यांचे समर्थक भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांचा अभिष्टचिंतन सोहळा.. अगदी कॉलेज जीवनापासून सुरेश धस आणि भाऊसाहेब भवर यांच्यातील मैत्री आज तगायत टिकून आहे.. त्याच मैत्रीचं रूपांतर कालांतरानं राजकारणात देखील दिसून आले..अनेक वेळा आपलेच आपल्यापासून दूर जातात परंतु भाऊसाहेब भवर यांनी यांच्या कॉलेज जीवनापासून सुरेश धस यांच्याशी केलेली मैत्री आज आमदार सुरेश धस यांच्यापर्यंत आज तक टिकून आहे. दोघेही एकमेकाचा शब्द तितकेच तोला मोलाचा समजत राजकीय जीवनात देखील काम करत आहेत.. सुरेश आण्णा धस यांच्या सोबत राहून त्यांच्या विचाराचा अनुकरण करत राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या परीने काम करण्याची क्षमता ठेवून काम करत आले आहेत सर्व क्षेत्रांमध्ये आपलं योगदान असलं पाहिजे हेच अण्णाचे मूलमंत्र भाऊसाहेब भवर यांच्या मनावर रुजले आणि आज तगायत ते सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत… मग धार्मिक क्षेत्रामध्ये कोणत्याही देवस्थानच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो.. गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नामध्ये असलेली कमतरता भरून काढण्याचे काम सुद्धा भाऊसाहेब अण्णा भवर यांनी केले आहे.. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्पर्धेचे आयोजन करून युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोरगरीब गरजूवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहित करून आपली सामाजिक बांधिलकी जपत नेत्याचा वारसा पुढे चालवण्याचं काम केले आहे. सर्वगुणसंपन्न नेत्याचा सर्वगुणसंपन्न कार्यकर्ता मित्र म्हणून भाऊसाहेब भवर यांच्याकडे पाहिलं जातं… आपल्या नेत्याला अभिमान वाटेल असेच काम आपल्या हातून व्हावे अशी देखील त्यांची कायमची भावना असते आणि तीच ते करत आहेत परंतु त्या मागे सुद्धा त्यांच्याच मैत्रीचं रहस्य असल्याचा सुद्धा दिसून येतो… मैत्री टिकावी ती कायमची… मैत्री असावी ती नात्यापलीकडची… मैत्री असावी ती हक्काची… मैत्री असावी ते आपुलकीची… याच मैत्रीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम सुद्धा भाऊसाहेब भवर यांनी केल्याने जनतेच्या मनात ते घर करून आहेत. आज भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा… आणि त्यांच्या मैत्री अधिक घट्ट होऊन इतरांना त्यांच्या मैत्रीची प्रेरणा मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
– प्रा.सचिन पवार
निर्भीड पत्रकार पाटोदा.