★आष्टी-पाटोदा-शिरूर तालुक्यात गटा निहाय कॉर्नर सभेचे आयोजन करून आजबेंचा एल्गार!
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी गटनिहाय कॉर्नर सभेचे आयोजन करून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम सुरू केले आहे. विकास कामांची यादी वाचत भविष्यात आपल्या विधानसभेचे नंदनवन करण्यासाठीचा संकल्प ते जनतेसमोर वाचून दाखवत आहेत. माझ्यात आणि विरोधी उमेदवारात असलेला फरक आणि केलेल्या कामातील फरक जनतेसमोर वाचून दाखल्याने जनतेत आमदार आजबें बद्दलची आपुलकी अधिक वाढत आहे.
विधानसभेचे वातावरण अतिशय गरम होऊ लागले आहे. आष्टी विधानसभेत महायुती मते फूट झाली भाजपचे सुरेश धस तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी मिळाली आहे. आष्टी विधानसभेवर विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचा दावा असल्याने त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे जनतेचाही जोरदार त्यांना प्रतिसाद मिळत असल्याने बाळासाहेब आजबे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार अशा चर्चा आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील पारापार वर सुरू आहेत. बाळासाहेब आजबे काका यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेला विकास निधी हा सर्वाधिक असल्याने आणि त्यांच्या कार्यकाळात कोणत्याच कार्यकर्त्यांना विरोधकांच्या कार्यकर्त्यांना कसलाच त्रास झाल्याने सर्वसामान्य जनता समाधानी आहे. राजकारणात मतभेद असावे परंतु वैचारिक हे बाळासाहेब आजबेंनी दाखवून दिल्याने. उद्याचा आमदार सुद्धा बाळासाहेब आजबेच असला पाहिजे अशा भावना सर्वसामान्य जनतेतून पुढे येत आहे.
★सर्वाधिक निधी आणणारे आ.बाळासाहेब आजबे
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पर्यंत जेवढे आमदार झाले त्यांच्यापैकी बाळासाहेब आजबे यांनी सर्वाधिक निधी उपलब्ध करून देऊन जनतेला त्यांच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले असून येणाऱ्या भविष्यकाळात यापेक्षा अधिक निधी उपलब्ध करून जनतेच्या सर्व अडचणी दूर करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे म्हणूनच जनता देखील त्यांना उद्याचा आमदार करणार आहे असा विश्वास सर्वसामान्य जनतेतून पुढे येत आहे.