पाटोद्यातील भाजपच्या सभेला उपस्थित रहा : ॲड.प्रकाश कवठेकर
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघ निवडणूकीतील भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ पाटोदा येथे दि.१२ रोजी दुपारी १ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन ॲड.प्रकाश कवठेकर यांनी केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघ निवडणूकीत भाजप-शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश धस हे निवडूकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आ.सुरेश धस हे मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघात काम करत आहेत. रांत्रदिवस ते जनतेच्या सेवेत असून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते झटत आहेत. मतदारासंघात अनेक विकासाच्या योजना त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात राबविलेल्या असून त्यांच्याकडे कामाचा माणूस म्हणून पाहिले जाते. मागील काळात ते विधान परिषदेवर असले तरी त्यांनी मतदारसंघात कायम आपले लक्ष ठेवून विकास कामे करून घेण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. शिवाय प्रत्येकांच्या सुखदूखात सामिल होणारा नेता म्हणून त्यांची मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रात ओळख आहे. आज रस्ते विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे जाहिर सभा होत आहे. या सभेला मतदारसंघातील नागरिकांनी सुरेश धस यांचे हात बळकट करण्यासाठी उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर यांनी केले आहे.