माझी हक्काची जागा भाजपला का सोडली ? ये बात जनता को कुछ हजम नही हुई!
★धामणगावच्या कॉर्नर सभेत आ.आजबेंचा हल्लाबोल!
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी विधानसभा मतदारसंघातील सुरु असलेल्या निवडणूकीसाठी राज्य पातळीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या जागा वाटपाच्या धोरणा नुसार सेटींग आमदारांना उमेदवारी देण्याचे निश्चित झालेले होते सर्व ठीकाणी तसेच झाले मात्र आष्टी मतदार संघातच असे काय घडले कि येथे जिल्ह्यातील नेते सांगत होते आ बाळासाहेब आजबे यांनाच उमेदवारी द्यावी तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी येथे भाजपाचे उमेदवार म्हणून सुरेश धस यांना उमेदवारी का दिली त्यांना उमेदवारी देऊन फडणवीसांना यातून काय साध्य करायचे आहे एवढे न समजण्याइतकी जनता दुधखूळी नाही आता हे षडयंत्र मतदारांना हळूहळू माहित होत असून या निवडणुकीत मतदार हे षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ बाळासाहेब आजबे यांनी केले.
धामणगाव ता आष्टी येथे आयोजित कॉर्नर सभेत उपस्थित मतदारांसमोर बोलत होते. यावेळी भाऊसाहेब लटपटे धैर्यशील थोरवे हरीभाऊ दहातोंडे महादेव डोके पोपट शेकडे बाळासाहेब पिसाळ संजय चौधरी अशोक गर्जै भागिनाथ विधाते बाबा भिटे दिलीप तांदळे पप्पू लोखंडे आदी उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना आ बाळासाहेब आजबे म्हणाले की आष्टी मतदार संघात मी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली बोगसगिरी केली नाही धामणगाव येथे देखील तलाव दुरुस्ती पेव्हर ब्लॉक रस्ते सभामंडप पांदण रस्ते शाळा खोल्या यासह विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला आणि ती कामे दर्जेदार केली माझ्या कार्यकर्त्यांनी कोणत्याच गावात कोणाला पाच वर्षात त्रास दिला नाही भाजपाच्या उमेदवारांकडे सर्व दहशत दादागिरी करणारे कार्यकर्ते आहेत आता देखील कार्यकर्ते व नागरिकांना फोन येतात बोलून घेतात आणि बळजबरीने प्रवेश करुन घेत आहेत हे उद्योग बंद करा लोकशाही मार्गाने निवडून होऊ द्या.लोकसभा निवडणुकीत कोणी काय केलय ते जनतेला चांगलं माहित आहे आमदार हा समस्या निर्माण करण्यासाठी नसतो तर समस्या सोडविण्यासाठी असतो मी पाच वर्षे मतदार संघात प्रामाणिकपणे काम केले कोणावरही खोटे गुन्हे दाखल केले नाही हप्तेखोरी केली नाही माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडून आमदारकीचा गैरवापर केलेला दाखवून द्या प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी झालोत.जनता सुज्ञ आहे या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करुन मला पुन्हा सेवा करण्याची संधी मतदार राजा देईल अशी खात्री मला आहे.यावेळी भाऊसाहेब लटपटे धैर्यशील थोरवे महादेव डोके यांनी मनोगत व्यक्त करुन आ बाळासाहेब आजबे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.धामणगांव येथे आ बाळासाहेब आजबे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली पिरबाबा दर्गा येथे चादर चढवून नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.या सभेसाठी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.
★माझ्या कार्यकर्त्यामुळे कोणालाच त्रास नाही
माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी कोणालाच त्रास दिलेला नाही. आम्ही विकासाला महत्त्व देतो विकास कामे दर्जेदार व्हावे यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहिलो आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील दर्जेदार कमी करून घेतली आहे. एकूणच मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी कुणालाच त्रास दिलेला नाही याउलट जनतेचे कामे दर्जेदार करून घेतले आहेत.
★दिशाभूल-फसवाफसवी-दादागिरी-हुकुमशाही हे सगळं जनता जाणते
माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणाचीही दिशाभूल फसवाफसवी हुकूमशाही दादागिरी मी केलेली नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी देखील कोणाला त्रास दिला नाही. हे कोण करतय हे सगळं जनतेला माहिती आहे त्यामुळे जनता मतदार रुपी आम्हाला आशीर्वाद देऊन पुन्हा सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास आहे. अशा भावना आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केल्या.