16.9 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

महेबूब शेख यांच्या विजयासाठी मराठा-मुस्लिम-दलित-ओबीसी बांधव एकवटले!

महेबुब शेखला विधानसभेत पाठवा ; तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील- शरदचंद्रजी पवार

★एका दगडात तीन पक्षी मारण्याची संधी- खा.बजरंग सोनवणे

★मतदार संघात एमआयडीसी व कारखाना सुरू करणार – महेबुब शेख

आष्टी | प्रतिनिधी

आष्टी मतदार संघ हा मागासलेला असून येथील पुढाऱ्यांना विविध विकास कामे करता आली नाही. या मतदार संघात रस्ते, पाणी, सिंचन, शेती, आरोग्य, रोजगार इत्यादी सर्व सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवता आले नाही. तुमचे सर्व प्रश्नांची जाण असणारे महेबुब शेख हे सर्व सामान्य नागरिकांच्या नेहमी हाकेला धावून येत सर्वांना न्याय मिळवून देणारे आहेत. त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतली असून महेबूब शेख यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. महेबुब शेख यांना विधानसभेत पाठवा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार ) अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांनी शनिवारी आष्टी येथे झालेल्या विराट जनसमुदायासमोर केले. देशात सध्या मोदींची सत्ता असून हे सरकार फक्त आश्वासने देत आहे. पण एकाही आवाश्नाची पुर्तता करत नसल्याचे पूर्ण देशाने पाहिले आहे. आता लोकांचा विश्वास सध्याच्या राज्य आणि केंद्र सरकारवर राहिला. या मतदार संघात शेती प्रश्न, पाणी प्रश्न, आरोग्य, रोजगार, रस्ते, एमआयडीसी, कारखाने यासह अनेक प्रश्न आहेत. तुमचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून मार्गी लावणार असल्याची ग्वाही देतो. तुम्ही मतदार संघाच्या विकासासाठी तरुण तडफदार व नवा चेहरा असलेल्या महेबुब शेख यांना विधान सभेत पाठवा असे आवाहन ही यावेळी शरदचंद्र पवार यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर खा. बजरंग सोनवणे, महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख, रामकृष्ण बांगर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सापते, प्रभाकर देशमुख, डॉ.महेश थोरवे, शिवभूषण जाधव, गुलाबराव घुमरे, आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे, बाप्पुसाहेब डोके, डॉ. शिवाजी राऊत, मिलींद आव्हाड, डॉ. नदिम शेख, ॲड रिजवान शेख, राहुल काकडे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा.बजरंग सोनवणे म्हणाले की, लोकसभेची पुनरावृत्ती आपल्याला या विधानसभा निवडणुकीत करायची आहे. आपल्या या मतदारसंघातील दहशत मिटवून टाकायची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सुध्दा आमच्या व्यासपीठावर कुणीही मोठा नेता नसतांना फक्त पवार साहेबांवर विश्वास ठेऊन मला विजयी केले आहे. सध्याचे सरकारवर शेतकरी, तरुण, कष्टकरी नाराज आहेत. येथील आजी माजी आमदारांनी जनतेचा विकास न करता स्वतः चा विकास केला. मतदारांनो मराठीत म्हण आहे की, एका दगडात दोन पक्षी मारायचे. परंतु तुम्ही एक नव्हे तर तीन पक्षी मारायचे. आपण येणा-या काळात आष्टी मतदारसंघात साखर कारखाना व एमआयडीसी सुरू करणार असल्याचा शब्द देतो असे ही खासदार बजरंग सोनावणे यांनी सांगितले.यावेळी उमेदवार महेबुब शेख म्हणाले की,मला या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निवडून द्यावे. या मतदार संघात मी एमआयडीसी व कारखाना सुरू करणार आहे. मतदार संघात दहशत निर्माण करणारे, इनामी जमिनी ताब्यात घेणारे, गुंडगिरी करणारे, बोगस कामे करून टक्केवारी मागणारे आमदार नसावेत. मी सर्व सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती असल्याने फॉर्म भरण्यासाठी आष्टी येथे आलो असता माझ्या गाडीचे नुकसान करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण मी यांच्या दहशतीला व गुंडगिरीला भित नाही. मला मतदार संघाचा विकास करावयाचा असून येथे एमआयडीसी व कारखाना सुरू करून 20 हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आहे. तसेच रस्ते, पाणी प्रश्न व खुंटेफळ साठवून तलावाचे काम मार्गी लावणार असल्याचे ही महेबुब शेख यांनी सांगितले. आपल्या दृष्टीने गडचिरोली हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो पण ह्यापेक्षा बेकार अवस्था आपल्या मतदार संघातील आहे. हुकूमशाही वर सत्ता येत नसल्याचेही महेबुब शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल जगताप यांनी केले तर आभार राम खाडे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमास मा आ.दादासाहेब कळमकर ,बापुसाहेब डोके, रामकृष्ण बांगर, शिवाजी राऊत , अमोल तरटे, आण्णासाहेब चौधरी, ॲड जाधव एन एल,राम खाडे,सुनील नाथ, दादासाहेब झांजे, रवी ढोबळे, शिवभूषण जाधव, मिलिंद आव्हाड, विजय गाढवे, डॉ .महेश थोरवे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, कुलदीपसिंग , गणी भाई तांबोळी, आदी उपस्थित होते. दुपारी तीन सायंकाळीं उशिरा पर्यंत कार्कर्त्यांसमवेत महिला ही जागेवरच बसून होत्या. यावेळी मोठ्या संख्येने विराट जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अनेकांनी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांमध्ये प्रवेश केले.

★सहकार महर्षी रामकृष्ण बांगर व डॉ. शिवाजी राऊत पक्ष प्रवेश

पाटोद्याचे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यांच्या प्रवेशाने महेबूब शेख यांचा विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे.

★पवार यांची सभा मेहबूब भाईच्या विजयाची नांदी

आष्टी झालेल्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेमुळे महेबुब शेख यांच्या विजयावर जवळपास सिक्का मोर्तब झाल्याचे दिसत आहे. सभेमुळे वातावरण बदल असून जनतेमध्ये तुतारी वाचण्याचा संकल्प झाल्याचा दिसत आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाने बांधली मेहबूब शेख यांच्या विजयाची वज्रमूठ..

★मुस्लिम-मराठा-दलित-ओबीसी आठरा पगड जातींची वज्रमुठ!

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील अठरापगड जाती धर्मातील मतदारांनी महेबूब शेख यांच्या विजयासाठी वज्रमुठ बांधले असून मुस्लिम मराठा दलित ओबीसी बांधव कामाला लागल्याचे दिसत आहे. येणाऱ्या 23 तारखेला विजयाचा गुलाल घेण्यासाठी सर्व जाती धर्मातील मतदार नागरिक सज्ज झाले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!