★मतदार संघाचा विकास हाच ध्यास घेऊन पुढे जाणार – आ. बाळासाहेब आजबे
आष्टी | प्रतिनिधी
गेले पाच वर्षे आमदार म्हणून काम करताना मी मतदार संघाचा विकास करण्यावरच भर दिला. मतदार संघ शांत कसा राहील हे पाहिले. विरोधी आमदाराने आमदारकीच्या काळात जे आमदाराचे काम असते ते न करता इतर गोष्टीवरच जास्त लक्ष दिले. मी मात्र आमदार म्हणून आमदाराचेच काम केले. यापुढेही मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन पुढे जाणार असल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
आ. बाळासाहेब आजबे यांचा दि. 9 रोजी मतदार संघातील किन्ही, बाबी, डोईठाण, सुरूडी, नागतळा, खडकवाडी, पांगरा, महिंदा, नागझरी, वनवेवाडी, माळेवाडी, पाटसरा, खलाटवाडी, हातोला, कापशी, धनगरवाडी आदि गावांमध्ये प्रचार दौरा संपन्न झाला यावेळी आ. बाळासाहेब आजबे बोलत होते. पुढे बोलतांना आ. आजबे म्हणाले की, मला माझ्या पुर्ण पाच वर्षाच्या काळात फक्त दोनच वर्ष काम करण्यासाठी मिळाले. मी आमदार झाल्यानंतर दोन वर्ष कोरोना काळात गेले, एक वर्ष विरोधी बाकावर गेले तर शेवटचे दोन वर्षच काम करण्यासाठी मिळाले. या दोन वर्षाच्या कालावधीत मतदार संघासाठी 2 हजार 500 कोटीचा निधी खेचून आणला आणि विकासकामे केली. मतदार संघातील पाणी, लाईट आणि शेती चे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने उजनी धरणातून खुंटेफळच्या धरणात पाणी आणण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. सध्या पाईपलाईन द्वारे 1.68 टीएमसी पाणी उजनी धरणातून खुंटेफळ धरण्यात येत आहे हे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित आपल्या मतदारसंघाच्या हक्काचे चार यांचे पाणी मतदारसंघाला मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हे पाणी गंगादेवी येथे टाकुन तेथून आष्टी तालुक्यातील संपूर्ण गावांना पाणी पुरवठा करता येऊ शकतो आणि ही योजना पूर्ण करण्याचा आपण भविष्यात प्रयत्न करू. त्याच बरोबर सुरूडी आणि शेडाळा येथिल शेडाळा येथिल आश्रम शाळा इमारत बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याच बरोबर आष्टी येथिल उपजिल्हा रूग्णालय मंजुर करून आणले आहे. मतदार संघात ज्या – ज्या ठिकाणी बंधाऱ्याची साईट उपलब्ध असेल तिथे बंधारे बांधले आहेत. तसेच तिन्ही तालुक्यात शासकीय निवासस्थाने कार्यालयीन इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला. असे असतांना माजी आ. सुरेश धस यांनी अनेक विकास कामांना आडकाठी आणली. आणि कामे बंद केली. या आमदार महोदयांनी आमदारकी अशा कामाला वापरली. माञ मी विरोधकांसारखी आपली आमदारकी इतर कामासाठी वापरली नाही तर मी माझी आमदारकी ही केवळ विकास कामांसाठी कामी लावली आहे. या निवडणुकीत मतदारांनी मला आशिर्वाद द्यावेत. पुढच्या काळात मतदार संघाच्या विकासासाठी दहा हजार कोटींचा निधी खेचून आणु असा विश्वास आ. बाळासाहेब आजबेंनी मतदारांना दिला. या प्रचार दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे इथपर्यंत पोहचलो
माझे वडील आमदार होते परंतु त्या निधनानंतर आमचे कुटूंब राजकारणापासून दुर होते. मी पंचायत समिती सदस्य असल्यापासून स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संपर्कात आलो. सन. 2009 च्या विधानसभा निवडणुकीला मला उमेदवारी दिली आणि माझे कुटूंब पुन्हा मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झालं. त्यानंतर 2014 ला उमेदवारी मिळाली असती परंतु मुंडे साहेबांच निधन झालं झाल्याने मला उमेदवारी नाही. परंतु साहेबांनी 2009 च्या निवडणुकीत मला उमेदवारी दिल्याने मी विधानसभेच्या स्पर्धे आलो. आणि मागच्या 2019 निवडणुकीत मी विजयी झालो. माझ्या राजकीय प्रवासात स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे मोठे योगदान असल्याचे आ. बाळासाहेब आजबेंनी बावी येथे झालेल्या काॅर्नर बैठकीत सांगीतले.