पुढील पाच वर्ष आमदार बाळासाहेब आजबे हेच आमदार राहणार ; जनतेचा विश्वास
★आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघातील अनेक धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन केली प्रचाराची सुरुवात
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आजबे काका यांनी मंगळवार दिनांक 05 नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील देव-देवतांचे दर्शन घेऊन व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून अभिवादन करत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केला.
आष्टी विधानसभेसाठी दिवसेंदिवस रंगत वाढली असून सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आजबे काका यांनी मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी आपला प्रचाराचा शुभारंभ साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केला सकाळी 9 वाजता कडा कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांचे आशीर्वाद घेत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला त्यानंतर कडा येथे महेश मंदिर व मौलाली बाबा दर्गा येथे दर्शन घेतले तर आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर पाटण येथील बिरोबा देवस्थान धनगड पाटण नारळ वाढवून दर्शन घेतले. त्यानंतर लाखो लोकांचे श्रद्धा स्थान असलेले गहिनीनाथ गड येथे गहिनीनाथ व वामन भाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले गहीनाथ गडाचे मठाधिपती ह भ प विठ्ठल महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. कुसळंब येथे खंडोबा देवस्थान या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून शुभारंभ केला तर अश्वलिंग देवस्थान पिंपळवंडी या ठिकाणीही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात अश्वलिंगाचे दर्शनी घेत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला अशा पद्धतीने आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आज दिवसभर मतदारसंघातील देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत आपल्या प्रचाराचा शुभारंभ साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केला.
★प्रचार शुभारंभातूनच विजयाची नांदी
आष्टी मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि उद्याचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार शुभारंभालाच विजयाची नांदी जनतेकडून मिळाली आहे. जनतेचा प्रतिसाद आणि जनतेच्या भावना लक्षात घेता. पुढील पाच वर्षे देखील बाळासाहेब आजबे आमदार राहतील असा विश्वास जनतेकडून मिळत आहे. एकूणच प्रचार सभेतून विजयाची नांदी मिळत आहे.
★मी केलेल्या कामाची पावती यावेळेस मतदार रुपी मिळणार : आ.आजबे
पाच वर्षांपूर्वी जनतेने माझ्यावर विश्वास टाकला होता आणि त्यांच्या विश्वासाला मी तळात जाऊन दिला नाही त्यामुळे या वेळेस देखील जनता फक्त विश्वासच नव्हे तर मी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून मतदार रुपी पुन्हा मला आशीर्वाद देतील आणि पुढील पाच वर्ष मला आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील असा विश्वास आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केला आहे.