विधानसभा निवडणुकीतून माघार
बीड | प्रतिनीधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं घोषित केलं आहे. मित्रपक्षांची कोणतीही यादी न आल्याने हा निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
काल दिवसभर मतदारसंघनिहाय चर्चा झाली. मित्र पक्षांची पहाटे 3 वाजेपर्यंत यादीच आलीच नाही. आपले कुणीच नाही त्यामुळे कुणालाच समर्थन द्यायचं नाही, असं ठरवलं आहे. एका जातीवर निवडणूक लढवणं कसं शक्य आहे. मी राजकारणात नवीन आहे. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. ह्याला पाड त्याला पाड ही भूमिका आपली नाही. उमेदवार पाडण्याची माझी इच्छा नाही. मात्र भूमिकेशी सहमत नसलेल्या उमेदवारांना पाडणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.