★जिकडे स्वार्थ तिकडे फारूक पटेल ; विचारधारेच आणि मुस्लिम समाजाच यांना काहीही घेणं देणं नाही
बीड | प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रा सह बीड जिल्ह्यामध्ये प्रचार यंत्रणा जोर घेत आहेत आजपर्यंत ज्या फारूक पटेल यांना क्षिरसागर कुटुंबाने सर्वस्व दिलं कोणतीही पात्रता नसताना नगरसेवक पदापासून उपनगराध्यक्ष पदापर्यंत सर्व वैभव मिळवून दिल पक्षाचा पार्टीचा आणि स्वतःच्या विचारधारेचा समाजाचा कोणताही विचार न करता जाती आणि धर्माच्या पार्टीसोबत आरोप पटेल साहेब स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेले आणि आज वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान केलं आहे भाजपच्या कमळ चिन्हाला मी मतदान केलं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला बीडची जागा मिळावी म्हणून आवाहन करत आहेत मागणी करत आहेत मात्र भारतीय जनता पार्टीने सातत्याने मुस्लिम समाजाविषयी माझ्या मुस्लिम बांधवांविषयी सातत्याने अतिशय खालच्या दर्जाची भूमिका घेतली आहे नको ते वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार आमदार नितेश राणे नारायण राणे यासह भाजपचे वरिष्ठ नेते सातत्याने मुस्लिम समाजाला या देशात राहण्याचा अधिकार नाही मुस्लिम समाजाला या देशातून हद्दपार केला पाहिजे मुस्लिम समाजा दहशतवादी आणि अतिरेकी असल्याची वागणूक या भाजप आमदार मंत्र्यांकडून दिले जाते यावर फारूक पटेल साहेब एक शब्द बोलायला तयार नाहीत स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र आम्ही भाजपला मतदान केले आहे. विधानसभेला आम्हाला मतदान करा आम्हाला उमेदवारी द्या आम्हाला निवडून द्या असा आवाहन करत आहेत त्यामुळे माझी मुस्लिम बांधवांना भगिनींना विनंती आहे जाती आणि धर्मात मतभेद लावून दंगली घडवणाऱ्या भाजप सारख्या जातीवादी पार्टी सोबत असलेल्या फारूक पटेल यांना आपण जाब विचारला पाहिजे गेले अनेक निवडणुकींमध्ये नगरसेवक म्हणून आपण त्यांना निवडून दिलं उपनगराध्यक्ष पदापर्यंत मानसन्मान दिला सत्तेतील सर्व मलिदा स्वतः घेतला समाजाशी इमानदारी करण्याची वेळ आली तेव्हा भाजप सारख्या जातीवादी पार्टीला त्यांनी मतदान करून स्वतःचा स्वार्थ साधला आणि आता परत विधानसभेमध्ये संधी मागत आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 20 तारखेला मतदान करत असताना मुस्लिम समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या फारूक पटेल सारख्या स्वार्थी लोकांपासून मुस्लिम समाजाने दूरच राहिले पाहिजे कोणत्या पक्षाला मतदान केलं आणि कोणत्या पक्षाचा प्रचार केला हेही मुस्लिम समाजाने त्यांना मत मागायला आल्यानंतर विचारावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षिरसागर यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीकाटिपणी करणाऱ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जशास तसे उत्तर देईल चा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी मराठवाडा अध्यक्ष कुंदन काळे यांनी दिला आहे.