आष्टीचे मतदार सापडले नेत्यांच्या खिंडीत!
★उमेदवार किती, मतदार किती, कोणता मतदार कुणाला मतदान करणार ?
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा मतदारसंघांमध्ये महायुती आघाडी यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भीमराव धोंडे यांनी अपक्ष फॉर्म भरून लढण्याचा निर्धार केला आहे. तुतारी कडून महेबुब शेख यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते कामाला लागले आहेत. भाजपकडून सुरेश धस व राष्ट्रवादी कडून बाळासाहेब आजबे यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. आता मतदारात सापडले खिंडीत कोणाला मतदान करायचं आणि उमेदवार कोण हेच कळायला तयार नाही.
अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून प्रचार जोरदार सुरू आहे तर तुतारीचे उमेदवार महेबूब शेख यांनीदेखील प्रचाराला सुरुवात केली आहे. धस आणि आजबे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याने मतदार चांगले गोंधळात पडले आहेत परंतु 28 तारखेला सुरेश धस हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून 29 तारखेला बाळासाहेब आजबे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा उमेदवार कोण असेल याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांचा उमेदवार जाहीर होईपर्यंत जनता शांत आहे आणि नेतेमंडळी सलाईनवर आहेत. जरांगे पाटलांचा निर्णय आल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होतील यात शंका नाही.
★काका-अण्णाचे कार्यकर्ते लागले कामाला!
आष्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भीमराव धोंडे यांनी अपक्ष फॉर्म भरला तर महबूब शेख यांनी तुतारी कडून फॉर्म भरला आहे. त्या दोघांनीही जोरदार प्रचार सुरू केला असला तरी बाळासाहेब आजबे व सुरेश धस यांचे कार्यकर्ते देखील जोमाने कामाला लागल्याचं दिसत आहे. सुरेश धस यांचा 28 तारखेला तर बाळासाहेब आजबे यांचा 29 तारखेला उमेदवारी अर्ज होणार दाखल..