★लोकनेते सुरेश आण्णा धस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा!
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भाग्यविधाते लोकनेते सुरेश आण्णा धस यांचा उमेदवारी अर्ज 28 ऑक्टोबर दिनांक सोमवारी बारा वाजता दाखल करण्यात येणार आहे तरी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुरेश आण्णा धस यांचे हात बळकट करावेत आणि आपल्या हक्काचा आमदार आपल्याला मिळवावा असे आव्हान युवा नेते राम धुमाळ, महेश खाकाळ यांनी केले आहे.
फक्त सुरेश आण्णा धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार नव्हे तर विजयात होणार आहे. सुरेश आण्णा धस यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना जनतेने यावेळेस आमदार करण्याचा निश्चय केला आहे. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजता अण्णा अर्ज दाखल करणार आहे तरी अन्नावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेने आणि आष्टी पाटोदा सर्व मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि सुरेश आण्णा धस यांनी केलेल्या कामाची त्यांना पोचपावती द्यावी असे आव्हान राम धुमाळ मा.सरपंच, महेश खकाळ युवा नेते, गौतम कर्डिले कडा ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच नवनाथ जाधव, विकास काका, रवी कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य अमोल सानप, युवराज ससाने, मनोहर धुमाळ, बबन धुमाळ, विजय काळुंखे, अनिल साळवे, अनिल गदादे, युवराज धुमाळ, मच्छिंद्र शेंडे, उपसरपंच महादेव लोंढे, राहुल ढोबळे, नितेश शेठ गुंदे,परसराम शिंदे यांनी केले आहे.
★हक्काचा आमदार म्हणजेच अण्णा!
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेचा हक्काचा आमदार आणि जनसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुरेश आण्णा धस खऱ्या अर्थाने हक्काचा आमदार म्हणून त्यांच्याकडेच पाहावं असं त्यांचं कर्तुत्व असल्याने येणाऱ्या विधानसभेत त्यांना जनता भरगोस मताने निवडून देईल असा विश्वास आहे.