कुसळंब येथे मनीषा केकानचा पत्रकार व ग्रामस्थांकडून सत्कार
पाटोदा / प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील गरीब कुटुंबातून आपलं स्वप्न उराशी बाळगत वाऱ्यासारखं अभ्यासात झेप घेणारी कुमारी मनीषा पीएसआय पदी झेप घेत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केला आहे. सध्या आटेगाव पठ्याला चांगलीच दिवस आले म्हणावे लागतील यापूर्वी चार महिन्यात एक पोलीस उपनिरीक्षक, एक कामगार आयुक्त, दोन फौजदार याच परिसरातून घडले आहेत..
मुगाव ची कुमारी मनीषा महादेव केकान हिने 2020 चा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला यामध्ये मनीषा महादेव केकान हिची फौजदार पद निवड झाल्याबद्दल कुसळंब येथे मराठी पत्रकार परिषदेचे कडून व ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सचिन पवार, अनिल गायकवाड, खंडेश्वर केटर्सचे मालक बाबुराव धारक, प्रेस फोटोग्राफर बाळासाहेब हुलजुते, युवा व्यावसायिक विश्वास पवार यांच्यासह उपस्थित होते…