आष्टीत भावनिक नव्हे! आर्थिक अन् राजकीय दृष्ट्या सक्षम उमेदवार हवा ?
★आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघात प्रस्थापितांचचं वर्चस्व होण्याची शक्यता!
पाटोदा | प्रतिनिधी
विधानसभेचे वातावरण तापत चालले आहे. तरीदेखील जरांगे पाटलाचा निर्णय येईपर्यंत सर्वच वातावरण थंडच राहणार यात शंका नाही. पण संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी आष्टी पाटोदा शिरूर मध्ये सक्षम उमेदवार न दिल्यास पुन्हा प्रस्थापितांच राज्य आष्टी मतदार संघावर येऊ शकतो यात शंका नाही. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून मेहबूब शेख अपक्ष म्हणून भीमराव धोंडे तर राष्ट्रवादी आमदार बाळासाहेब आजबे तर भाजपकडून सुरेश धस उमेदवार असण्याची शक्यता आहे. आता जरांगे पाटलांनी जर उमेदवार यांच्या तोडीस तोड न दिल्यास पुन्हा प्रस्थापितच आष्टी विधानसभेवर राज्य करणार यात शंका नाही.
आष्टी विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस यांना टक्कर देणारा उमेदवार तोही सर्व गुण संपन्न, आर्थिक दृष्ट्या सक्षम, राजकीय दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे, त्यामुळे पाटलांनी जर योग्य उमेदवार दिला तरच आष्टी विधानसभेत जरांगे फॅक्टर चालू शकतो अन्यथा पुन्हा प्रस्थापितांचे राज्य येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भावनिक दृष्ट्या निर्णय न घेता आता राजकीय दृष्ट्याच निर्णय घ्यावा लागेल असं जनतेतून मत व्यक्त होत आहे.
★जरांगे पाटील यांचा उमेदवार आर्थिक, राजकीय दृष्ट्या सक्षम हवा!
आष्टी विधानसभेत दिग्गजांची फौज उभे असताना फक्त भावनिक दृष्ट्या जरांगे पाटील यांना उमेदवार देऊन चालणार नाही तर तो आर्थिक दृष्ट्या आणि राजकीय परिपक्व असला पाहिजे तरच या ठिकाणी जरांगे फॅक्टरचा फायदा होईल आणि निवडूनही येईल परंतु भावनिक दृष्टीने निर्णय घेतल्यास आष्टी विधानसभा पुन्हा प्रस्थापितांच्याच हाती जाईल यात शंका नाही.
★धस-धोंडे-आजबेंना टक्कर देणारा उमेदवार पाटील देणार का ?
बीड जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज निवडणूक आष्टी विधानसभेत पाहायला मिळणार आहे. परंतु सध्याचे चित्र पाहता आष्टीचे चित्र विचित्र होताना दिसत आहे. तुतारी गटाकडून महेबुब शेख यांना उमेदवारी मिळाली तर अपक्ष उमेदवार धोंडे यांनी ताकद आज बनवण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून सुरेश धस तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या प्रस्थापित विरुद्ध जरांगे पाटील यांनाच टक्कर देणारा राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवार देणार का ? जर भावनिक दृष्ट्या निर्णय घेतला तर या ठिकाणी पुन्हा आजबे धोंडे यापैकीच आमदार होऊ शकतो ही कळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं सर्वसामान्य जनतेतून बोललं जात आहे.