14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

आष्टीचे चित्र-विचित्र ?

★भिमराव धोंडे यांच्यासाठी शुभ संकेत!

मताच विभाजन झाल्यावर धोंडे साहेबाची आमदारकीवर वर्णी लागणार यात शंका नाही.

पाटोदा | प्रतिनिधी

आष्टी पाटोदा विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगदार होताना दिसत असून भाजप राष्ट्रवादीचे तिकीट अद्याप जाहीर झालेलं नाही ओढाताण सुरू असल्याने हे तिकीट कुणाला जाणार याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र भीमराव धोंडे यांनी अपक्ष फॉर्म भरून सर्वांनाच आकर्षित केलं आहे आणि एक प्रकारे त्यांना आज शुभ संकेतच मिळालं असं म्हणावं लागेल. तुतारी गटाची उमेदवारी मेहबूब शेख यांना जाहीर होतात धोंडे गटात आनंदाच वातावरण. मग आता लॉटरी कुणाची लागणार हे पहावं लागणार आहे.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात फक्त तुतारी गटाकडून मेहबूब शेख यांचं नाव अद्याप जाहीर झाले असून महायुतीकडून राष्ट्रवादी-भाजप यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही तरीदेखील धोंडे यांनी अपक्ष फॉर्म भरून आपला निर्णय जाहीर केली आहे. मग महायुती का आघाडी अशी रंगत होते का एकतर्फी धोंडेच विजय होतात का मेहबूब शेख विजय होतात हे पहाव लागेल. धोंडे शेख यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आजबे आणि धस काय करणार याकडे लक्ष लागले आहे. तरी देखील 29 तारखेपर्यंत अद्याप कोण उमेदवार आणि कोण नाही हे स्पष्ट सांगता येत नाही.

★आष्टी मतदार संघात जरांगे फॅक्टर जोरदार चालणार

आष्टी मतदार संघामध्ये धोंडे आणि मेहबूब यांची उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी अद्याप राष्ट्रवादी आणि भाजप यांनी आपला उमेदवार जाहीर केला नसल्याने आणि जरांगे पाटील यांनी आपला पत्ता बाहेर न काढल्याने निवडून कोण येईल हे सांगता येत नाही पण पाटलांनी जर उमेदवार दिला तर तो कोण आणि कुणाचा असेल यावर प्रश्नचिन्ह आहे..

★मेहबूब शेख यांना पाटलांचा पाठिंबा मिळाला तर धोंडे-शेख यांची सरळ सरळ फाईट!

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जर तुतारी गटाचे मेहबूब शेख यांना पाठिंबा जाहीर केला तर धोंडे व शेख यांच्यात सरळ सरळ फाईट होऊ शकते त्यामुळे अध्याप तरी राष्ट्रवादी भाजप आणि जरांगे पाटील यांचा निर्णय आलेला नाही त्यामुळे चित्र स्पष्ट सांगता येत नाहीत..

★आष्टीतून धोंडे शिरूर मधून शेख पाटोद्यातून कोण ?

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघ हा तीन तालुक्याचा मिळून बनला असला तरी आत्तापर्यंत आष्टी तालुक्यातच वर्चस्व मतदार संघावर राहिली आहे आता अपक्ष म्हणून धोंडे साहेब आष्टीतून मेहबूब शेख शिरूर मधून मग पाटोदा तालुक्यातून कोण ? असा सूर जनतेमधून समोर येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!