★संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाकडे मराठा मुस्लिम दलित ओबीसी बांधवांच्या नजरा!
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आलेली पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. तरीदेखील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खास करून बीड विधानसभेसाठी उमेदवार कोण यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेच्या तोंडी फक्त किशोर पिंगळे यांचाच नाव समोर येत असून त्यांनाच उमेदवारी जाहीर करावी चर्चा सुरू आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आज तगायत किशोर पिंगळे सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मराठा सेवा किशोर पिंगळे यांनी स्वतःच अस्तित्व राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तयार करून युवकांना एकत्रित करून आणि अडचणीत धावून जाणं आणि मदत करणं ही त्यांची पहिल्यापासूनच असलेली ओळख आज तगायत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आज तगायत खंबीरपणे सावली सारखं उभ असलेलं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. बीड शहरात मराठा मुस्लिम दलित समाजामध्ये त्यांची चांगलीच क्रेझ असून त्यांना उमेदवारी मिळाली तर मोठ्या मताने निवडून येतील असा जनतेचा विश्वास आहे. मराठा मुस्लिम दलित समाजामधून देखील त्यांच्या नावाला पसंती मिळत असून उमेदवारी जाहीर करून बीड विधानसभेला हक्काचा स्वाभिमानी संघर्षशील उमेदवार द्यावा अशी मागणी सुद्धा होत आहे.
★पाटलांच्या आंदोलनात 23 नंबरची गाडी कायमच दिसायची
मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मराठा सेवक किशोर पिंगळे हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. 23 नंबरची गाडी कुठेच दिसली नाही असं होणार नाही जिथे पाटलांची गाडी तिथे ही गाडी आपल्याला पाहायला मिळालीच असेल यात शंका नाही म्हणूनच आपल्या हक्काचा, स्वाभिमानी, विश्वासाचा, आपला उमेदवार म्हणून किशोर आप्पा पिंगळे यांच्याकडे बीड विधानसभेतील जनता पहात आहे त्यामुळे पाटलांनी जनतेचा विचार करून आप्पांना उमेदवारी जाहीर करावी अशी विनंती होत आहे.
★पाटलांचा आदेश आला तर लढणार अन् जिंकणार : किशोर पिंगळे
गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी आपला जीव पणाला लावून लढणारा आमचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय सर्वांनाच मान्य आहे. बीड विधानसभेची निवडणूक मी लढवावी अशी मराठा मुस्लिम दलित ओबीसी सर्व बांधवांची इच्छा आहे त्यांच्या इच्छे खातर मी आज फॉर्म देखील घेतला परंतु पाटलांचा आदेश येईपर्यंत पुढचं पाऊल उचलणार नाही पाटलांचा आदेश हाच आमच्यासाठी अंतिम आदेश आहे. पाटलांनी आदेश दिला लढण्याचा तर लढणार आणि जिंकूनही येणार…
– किशोर पिंगळे
मराठा सेवक बीड.