★अठरापगड जातीने किशोर पिंगळेंसाठी बांधली वज्रमुठ : संदीप बुधनर, सुमित नलावडे, श्याम सपकाळ
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किशोर आप्पा पिंगळे यांनी युवकांना सक्षम करण्यासाठी मोठी चळवळ उभा केली आहे. राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवकांना संघटित करून निर्व्यसनी करून एक दुसऱ्यांना मदत करण्यासाठी सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत दिन दलित उपेक्षितांना त्यांनी संघटनेच्या माध्यमातून आधार दिला आहे. तर सध्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या लढ्यात पहिल्या दिवसापासून सावलीसारखं सोबत राहणार बीड जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणून किशोर पिंगळे यांच्याकडे पाहिलं जातं सबंध महाराष्ट्र किशोर पिंगळे यांना जरांगे पाटलांची सावली म्हणून पाहतात. आज बीड विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी उतरावे अशी 18 पगड जाती धर्मातील लोकांची इच्छा आहे. पाटील त्यांनाच उमेदवारी देतील अशा भावना संदीप बुधनर सुमित नलावडे, श्याम सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
बीड विधानसभा निवडणुकीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सावली मराठा सेवक किशोर पिंगळे यांनी बीड विधानसभेची निवडणूक लढवावी अशी बीडमध्ये जोरदार चर्चा आहे. पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून युवकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा आणि त्यात मिळालेलं यश खूप मोठा आहे. आता जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाच्या लढ्यात खंबीरपणे सोबत राहून यश मिळेपर्यंत हा लढा लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यांचा लढा आणि संघर्ष खूप महत्त्वाचा आणि मोठा असल्याने बीड विधानसभेतील नागरिकांना देखील विशेष करून मराठा मुस्लिम दलित धनगर ओबीसी सर्वच अठरापगड जातीतील लोकांना किशोर आप्पा पिंगळे यांच्यासारखा आमदार आपल्याला मिळावा अशी अपेक्षा आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातून संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा सेवा किशोर पिंगळे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी संदीप बुधनर सुमित नलावडे, श्याम सपकाळ यांनी केली आहे.
★किशोरआप्पा आमदार झाल्यास सर्व जाती धर्माला न्याय मिळेल
बीड विधानसभेचे तिकीट किशोर आप्पा पिंगळे यांना मिळालं तर त्यांच्या माध्यमातून बीड विधानसभेसह बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय मिळू शकतो म्हणूनच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सर्वच जाती-धर्माचा विचार करून किशोर आप्पा पिंगळे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.