★गेल्या वेळेस धोका झाला यावेळेस नाही ; जनतेचा सूर!
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून माजी आमदार भीमराव धोंडे साहेब माजी आमदार सुरेश आण्णा धस व विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका हे प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा या तिकिटावर अधिकृत दावा असल्याने धस आणि धोंडे यांची चांगलीच गोची झाली आहे. धस हे पायात भिंगरी बांधल्यासारखं पूर्ण मतदार संघ पिंजून काढत असून बाहेरगावी कामानिमित्त असलेल्या नागरिकांचे कौटुंबिक मेळावे घेत आहेत. तर भीमराव धोंडे साहेब यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघ पूर्ण पिंजून काढला आहे. जर आष्टी मतदारसंघ भाजपला सुटला तर धोंडे की धस असा प्रश्न उद्भवणार आहे. पण धोंडे साहेबांचा अधिकृत दावा असल्याने धस यांची चांगलीच गोची झाली आहे. धोंडे साहेबांनी आधी जाहीर केला आहे भाजपकडून मीच उमेदवार आहे आणि उमेदवारी नाही मिळाली तर मतदार संघातील जनतेशी चर्चा करून अपक्ष लढवण्याचा निर्णय त्यांनी केला आहे. तसेच धस साहेब यांनी देखील गाठीभेटी कौटुंबिक मिळावे घेत एक प्रकारे तयारीत सुरू केली आहे पण त्यांनी अद्याप भाजपची अपक्ष जाहीर केले नाही.
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे महायुतीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याची जोरदार चर्चा आहे परंतु आणि वेळी आष्टीची जागा भाजपला सुटू शकते पण त्या जागेत पुन्हा वाद होऊ शकतो त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच राहील की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर ही जागा राष्ट्रवादीला राहिली तर राष्ट्रवादी विरुद्ध तुतारी अशी सरळ फाईट होणार आहे. पण धोंडे साहेब अपक्ष राहिले तर तिरंगी लढत पण काठी की टक्कर होऊ शकते. उमेदवार कोण ? भाजप की राष्ट्रवादी राष्ट्रवादी राहिली तर आजबे भाजप राहिलं तर धोंडे की धस त्यामुळे आष्टी मतदार संघाचे उमेदवारीचे चित्र एबी फॉर्म मिळाल्यावर स्पष्ट होईल याच शंका नाही. पण भीमराव धोंडे यांनी जाहीर केले आहे. भाजपकडून मिळाली बर ठीक नाहीतर अपक्ष लढू त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे.
★धोंडे अपक्ष राहिल्यास फायदा होऊ शकतो
भारतीय जनता पार्टी कडून आष्टी मतदार संघात भीमराव धोंडे आणि सुरेश धस हे दोघे प्रबळ दावेदार आहेत परंतु या दोघांमध्ये कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. हाच प्रश्न धोंडे साहेबांना विचारल्यानंतर त्यांनी मी प्रबळ दावेदार असल्याचा जाहीर केलं जर तिकीट नाही मिळालं तर जनतेची चर्चा करून अपक्ष सुद्धा लढू असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. अपक्ष राहिल्यास मीच निवडून येईल हे देखील त्यांनी ठणकावून सांगितल आहे.
★सुरेश धस यांची जोरदार मोर्चे बांधणी!
माजी आमदार सुरेश आण्णा धस यांनी कार्यकर्त्यांची जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. भारतीय जनता पार्टीच तिकीट त्यांनाच मिळणार असं त्यांच्या कामावरून दिसत आहे. पूर्ण कुटुंबच आष्टी मतदार संघ पिंजून काढत असून स्वतः धस साहेब बाहेरगावी असणाऱ्या नागरिकांचे कौटुंबिक मेळावे घेत मोर्चे बांधणी करत आहेत. एकूणच त्यांच्या तयारीवरून सुरेश धस निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे.
★विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेचं महायुतीचे उमेदवार ?
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी महायुतीच्या फॉर्मुल्यात राष्ट्रवादीच्या एकाही विद्यमान आमदारांचे तिकीट कट होणार नाही त्यामुळे महायुतीचे उमेदवार बाळासाहेब आजबे हेच असतील त्यानुसार बाळासाहेब आजबे काका यांनी सुद्धा आपली तयारी जोरदार सुरू केली असून कार्यकर्त्यांना कामाला मागण्याची आदेश दिले आहेत.