महायुतीकडून आजबे काका फायनल ; धस अण्णा,धोंडे साहेब काय करणार ?
★राष्ट्रवादीच्या विद्यमान 60 आमदारांचे तिकीट निश्चित झाल्याने महायुतीत इच्छुकांची गोची!
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे 60 विद्यमान आमदारांचे तिकीट फायनल झाल्याच सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे. आता महायुतीचे शिवसेना भाजप घटक पक्ष असल्याने त्यांच्या पक्षातील इच्छुक उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. आता इच्छुक उमेदवार तसेच भाजप सेनेचे उमेदवार बंडखोरी करणार का ? राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सहकार्य करून निवडून आणणार हे पहावं लागणार आहे.
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांचं तिकीट जवळपास फायनल झाल्यात जमा आहे. आता भाजपकडून सुरेश आण्णा धस भीमराव धोंडे हे इच्छुक होते आणि त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका संवाद मिळावे देखील घेतली आहेत त्यामुळे आता हे दोन इच्छुक काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर धोंडे साहेबांनी अपक्ष लढवण्याचा सुद्धा जाहीर केला आहे. पण धस अण्णा यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. पक्षाचा आदेश मानणार का ? अपक्ष राहणार का ? कुणाला पाठिंबा देणार ? हे पहाव लागेल..
★आष्टीत काकाच फायनल!
आष्टी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका हे पक्षाच्या नियमानुसार फायनल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद तर आहेच परंतु धोंडे साहेब आणि धस साहेब काय करतात याकडे हीच लक्ष ठेवून आहेत.
★आता तुतारी कडून कोण ?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने म्हणजेच तुतारीच्या चिन्हावर कोण असणार हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे. परंतु आष्टी मतदार संघातून विशेष करून आष्टीतूनच आणि तोही नवीन चेहरा असणार यात शंका नाही असेही चर्चा असल्याचं बोललं जात आहे.
★अण्णांचा निर्णय काय ?
माजी आमदार सुरेश आण्णा धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघ पिंजून काढला असून बाहेरगावी म्हणजेच पुणे मुंबई या ठिकाणी असणाऱ्या मतदारांच्या देखील कौटुंबिक मेळाव्याच्या माध्यमातून हितगुज केले आहे. पण राष्ट्रवादीला जागा सुटल्याने सुरेश आण्णा धस काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे…