मराठ्यांचा गनिमी कावा ; पाडायचं की लढायचं ?
शासनाची आचारसंहिता 15 ऑक्टोबरला लागली मराठ्यांची आचारसंहिता 20 ऑक्टोबरला लागणार !
★17 ऑक्टोबरला इच्छुकांची तर 20 ऑक्टोबरला निर्णयक बैठक!
बीड | प्रतिनिधी
गेल्या एक-दीड वर्षापासून मराठा आरक्षणाच आंदोलन सत्र सुरू आहे. अध्याप आरक्षणाच मार्ग मोकळा झालेला नाही. लोकसभेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठ्यांची ताकद दाखवून दिल्यानंतर देखील सत्ताधारी भाजप सरकारला कसलीच बद्दल घडली नाही असं चित्र दिसत आहे. आता विधानसभेतही सुपडा साफ करण्याची भाषा मराठा समाजाकडून होत आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये मराठ्यांचा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा होती परंतु भाजप सरकारने त्यावर कसलीच स्पष्ट भूमिका न घेता इतर बारा जाती ओबीसी केंद्रामध्ये घालून मराठ्यांच्या दुःखावर मीठ चोळला आहे. आता विधानसभेची आचारसंहिता जरी लागली असली तरी मराठा समाजाने पाडायचं की लढायचं हा निर्णय 20 तारखेला घेण्याचं ठरवलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आचारसंहिता 20 तारखेलाच लागेल असं बोललं जात आहे. 17 ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवाराची बैठक तर 20 ऑक्टोबर रोजी मराठा समाज लावणार आचारसंहिता चर्चेला उधाण आले आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची बैठक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत घेणार असल्याचे स्पष्ट केलं असून अंतिम निर्णय म्हणजेच पाडायचं की लढायचं हे 20 ऑक्टोबर रोजी ठरणार असून त्याच दिवसापासून खऱ्या अर्थान आचारसंहिता लागू होईल असं बोललं जात आहे. दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाकडून घेतलेला शब्द आणि आता वीस तारखेला पाटलांचा येणारा आदेश हा महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून दसरा मेळाव्यातून शब्द घेतला आहे मी जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल आणि मराठा समाजाने देखील तो मान्य केला आणि हात वर करून सांगितलं की पाटील तुम्ही जो आदेश द्याल तो आम्ही पाळू तुम्ही फक्त आदेश घ्या त्यामुळे आता वीस तारखेला जरांगे पाटील काय आदेश देतात या कडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
★पाडायचं की लढायचं ?
20 ऑक्टोबर रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील घेणार महाराष्ट्राच्या विधानसभेचा निर्णय. पाडायचं की लढायचं ? हा निर्णय सराटी अंतरवाली येथून 20 ऑक्टोबर रोजी सबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाला येणार असल्याने महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे त्यामुळे खऱ्या अर्थान आचारसंहिता 20 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल असं बोललं जात आहे.
★भाजपमधीलही इच्छुक आणि सत्ताधारी आमदार पाटलांच्या दारी
भारतीय जनता पार्टी मधील इच्छुक असलेले उमेदवार आणि सध्या विद्यमान तसेच आजी-माजी आमदार देखील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या घराचे उंबरठे शिजवताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेचे चित्र सराटी अंतरवाली होणाऱ्या 20 ऑक्टोबर च्या बैठकीतूनच स्पष्ट होतील यात शंका नाही.
★मराठ्यांसाठी ही विधानसभा स्वाभिमानाची
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही मराठ्यांच्या अस्तित्वाची स्वाभिमानाची आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षाची असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांनीच खून गाठ बांधली असून मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तोच आम्हाला मान्य असेल असं देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. पाटलांचा आदेश आला पाडायचं किंवा लढायचं तर या दोन्ही गोष्टीसाठी महाराष्ट्रातील मराठा समाज तयार आहे.
★महाराष्ट्राची सूत्र सराटी अंतरवालीतूनच हलणार!
विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राची असली तरी महाराष्ट्राचे सर्व सूत्र आता सराटी अंतरवालीतूनच हलणार. कोण आमदार करायचा आणि कोण नाही हे 20 तारखेला जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील मराठी सराटी अंतरवालीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा आदेश आला की मराठे कामाला लागलेच म्हणून समजा अशी चर्चा जोरदार सुरू आहे.