पाच वर्षात एक रुपयाचा ही डाग लावुन घेतला नाही – आ.बाळासाहेब आजबे
आष्टी | प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण मतदारसंघात जवळपास 2300 कोटी रुपये ची विकास कामे मंजूर करून आणले आहेत त्यापैकी अनेक कामे प्रगतीपथावर असून काही कामे पूर्ण झालेली आहेत हे सर्व कामे करत असताना आपण एक रुपयाचाही कोठे डाग लावून घेतला नाही जनतेच्या सेवेसाठी निस्वार्थपणे काम करत राहिलो त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता आपल्याबरोबर आहे आष्टीची महायुतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटणार आहे त्यात काही खालीवर झाले तर धोंडे साहेबांचे काम मी करील किंवा माझे काम धोंडे करतील असे यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सांगितले .
आष्टी तालुक्यातील महसूल कर्मचारी निवासस्थान व आष्टी नगरपंचायत हद्दीतील पंधरा कोटी रुपयेच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे माजी जिप सदस्य डॉक्टर मधुकर हंबर्डे युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले महादेव महाजन हरिभाऊ दहातोंडे परशुराम आबा मराठे संदीप सुंबरे नगरसेवक नाजीम शेख सुखदेव पोकळे यांचे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार आजबे म्हणाले की आष्टी नगरपंचायत अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही नगरपंचायत मध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे कामे करताना नगरपंचायतला विश्वासात घेऊन कामे कार्यकर्त्यांनी करावीत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची पण खबरदारी संबंधित गुत्तेदार यांनी घ्यावी आष्टी येथील शनी मंदिर व फत्तेशहा बुखारी दर्गा परिसरात नारळ फोडून कामांचा शुभारंभ करण्यात आला तर आष्टी तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी 13 कोटी 80 लक्ष रुपयांच्या महसूल निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन पंचायत समिती शेजारी परिसरात करण्यात आले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यातील शासकीय कार्यालयासाठी जवळपास 100 ते 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांच्या निवासनासाठी ही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून हे कामे मंजूर केले आहेत त्यामुळे यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालय व त्यांचे निवासस्थाने हे सुसज्ज असणार आहेत त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामास गती मिळण्यास मदत होईल याचबरोबर मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी काम करण्याचा व ते काम दर्जेदार कसे होतील यासाठी गेल्या पाच वर्षात सरकारकडे पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेतली आपण केलेले विकास कामे जनतेला जर मान्य असतील तर तर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला मायबाप जनता ही पुन्हा निवडून देईल आपण गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली परंतु एक रुपयालाही कोणाच्या लाजिंदार झालो नाहीत आलेली कामे जनतेपर्यंत कशी पोहोचतील व ते दर्जेदार कशी होतील यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे विकास कामाच्या जोरावर व जनतेच्या विश्वासावर येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून जनतेने संधी दिल्यास मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत पाच वर्षात आपण कोणावरही अन्याय होईल असे एकही काम केले नाही त्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे येणारी निवडणूक ही जनतेच्या विश्वासावर व विकास कामाच्या जोरावर आपण सामोरे जाणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी ग्रा प सदस्य संतोष कदम बबन काळे गणेश पडोळे पंडित पोकळे काका पोकळे दिपक पिसाळ,श्रीराम गोंदकर दिलीप चव्हाण विजय देशमुख देवेश शेट्टी अय्याज कुरेशी वाहेद सय्यद गणेश धोंडे माजेद शेख विलास गायकवाड मुकेश सायकड काशीगिर शिंगारे कृषी वाल्लेकर आकाश पवळे सुनिल निकाळजे यांच्यासह आष्टी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.