★सहा-सात वेळेस रस्ता करूनही तीच अवस्था ; जनतेत तीव्र नाराजी
कुसळंब | प्रतिनिधी
कुसळंब वांजरा फाटा रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर झाला पण त्या पैशाचा उपयोग काहीच झाला नाही याउलट तो पैसा पूर्णपणे खड्ड्यात गेला असं म्हणावं लागेल. कुसळंब वांजरा फाटा रस्ता अवघ्या दोन ते तीन महिन्यात खराब झाला असून त्यावर आता सहा ते सात वेळेस खड्डे बुजवण्याचे काम झाले आहे तरीदेखील ते खड्डे सुद्धा व्यवस्थित बुजवले नाहीत म्हणून जनता तीव्र नाराज असून त्या गुत्तेदाराला बोलवून त्याचा सत्कार करणार असं बोललं जात आहे..
रस्त्याच्या कामात इतकीच बोगसगिरी सुरू आहे आता प्रशासन अधिकारी याकडे गांभीर्याने पाहिल का ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. जनतेने बोलून काहीच उपयोग होत नाही अधिकारीच मूग गिळून गप्प बसले आहेत मग काय करणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. जे अधिकारी असतील त्यांनी संबंधित गुतेदाराला दोषीत समजून त्याचं परवाना रद्द करावा आणि कुसळंब – वांजरा फाटा रस्ता त्याच्याकडून नव्याने दुरुस्त करून घ्यावा अशीच मागणी होत आहे.
★कुसळंब – वांजरा फाटा रस्ता अन् गुत्तेदार यांचा सत्कार करावा म्हणतोय!
कोट्यावधी रुपये खर्च करून कुसळंब वांजरा फाटा रस्ता करण्यात आला असून या रस्त्यावर अवघ्या तीनच महिन्यात खड्डे पडले होते. तसे खड्डे आत्तापर्यंत सहा वेळेस बुजवले आहेत तरीदेखील खड्डेच पडतात याचा अर्थ किती भ्रष्टाचार केला आहे हे उघड होत आहे तरीदेखील संबंधित अधिकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत मग अधिकारीच मिंधे आहेत का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे आणि मिंधे नसतील तर संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करतील आणि त्याच गुत्तेदाराकडून हा रस्ता पुन्हा नव्याने करून घेतील अशी अपेक्षा आहे.