आ.आजबेच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाची शासवत विकासाकडे वाटचाल…
★हाच तर आहे आमदार बाळासाहेब आजबे काकांच्या संकल्पनेतील विकास!
★आष्टी मतदारसंघाला विकासाचे तोरण हे आजबेंचे धोरण
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच्या विकासाची धुरा आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी हाती घेतल्यापासून सिंचनापासून दळणवळणापर्यंत सर्वच गोष्टी झपाट्याने विकासाच्या दिशेने धावत आहेत. आष्टी तालुक्यातील महत्वकांक्षी कुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पाटोदा व शिरूर तालुक्यात दळणवळण आणि शासकीय इमारतीसाठी खेचून आणलेला निधी हा अतुलनीय आहे. यामुळेच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेने आमदार करण्यासाठी केला होता हट्टास. जनतेच्या त्याच हाताला आमदार बाळासाहेब आजबेंनी सुद्धा पूर्णत्वाकडे घेऊन गेले आहेत. जनतेच्या मनातील विकास त्यांनी साक्षात उतरवला आहे.
आज पाटोदा तालुक्यातील दुय्यम निबंध कार्यालय बांधकामासाठी 2 कोटी 12 लाख रुपये, प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यासाठी 23 कोटी 94 लाख रुपयांची मंजुरी मिळून कामाचे भूमिपूजन आज होत आहे, त्याचबरोबर महसूल अधिकारी व कर्मचारी निवास स्थान इमारत बांधकाम करण्यासाठी 14 कोटी 38 लाख रुपयाचे भव्य भूमिपूजन आज होत आहे. तसेच हिवरसिंगा र.मा.59 पासून वडझरी, डोंगरी, रोहतवाडी रा.मा.55 वर थेरला, सावरगाव, सोनेगाव, दासखेड, पाचंग्री प्राजिमा 1 की.मी. 0/00 ते 41/00 मध्ये रुंदीकरणासाठी सुधारणा करणे हाय ब्रीड ऑन्यूड्युटी अंतर्गत 206 कोटी 33 लक्ष रुपयाच्या रस्ता कामाचा भव्य शुभारंभ देखील रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी दासखेड येथे होणार आहे. या भूमिपूजन समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अमरसिंह पंडित, लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे, मोहोळ विधानसभा सदस्य यशवंत माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूमिपूजन समारंभ कार्यक्रम रविवार दिनांक सहा रोजी सकाळी 10:30 ला दासखेड येथे तर 11:45 ला विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाटोदा या ठिकाणी तर होणार आहे, तरी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
★जनतेच्या सेवेत कायम – आ. आजबे
माझ्या आमदारकीचा कार्यकाळ हा जनतेच्या सेवेसाठी वाहिला असून येणाऱ्या काळात देखील जनतेसाठी काम करत राहील. आमदारकीचा उपयोग एनसीवीसाठीच असेल आणि तो केला आहे आणि यापुढे देखील करत राहील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच माझी आमदारकी आहे आणि तेच आज पर्यंत केले आहे आणि करत राहणार आहे.