★हुतात्मा विद्यालय जिल्ह्यात प्रथम ; जालना येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड
पाटोदा | प्रतिनिधी
नुकत्याच शालेय कबड्डी स्पर्धा तालुका जिल्हा स्तरावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भायाळाच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवत आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल केलं आहे तसेच प्रशिक्षक शिक्षक मुख्याध्यापक यांच्या अभिमानात भर टाकली आहे. या उत्तम कामगिरीबद्दल खेळाडूसह प्रशिक्षक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षक इतर कर्मचारी या सर्वांचे विद्यालयाचे संस्थापक सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब, भायाळा गावच्या सरपंच सौ. सत्यभामाताई बांगर, युवा नेते विजयसिंह बांगर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भायाळाच्या कबड्डी संघाने विद्यालयाच्या अभिमानात भर टाकली असून जालना येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंचे सर्वांचे विद्यालयाचे संस्थापक सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब, भायाळा गावच्या सरपंच सौ. सत्यभामाताई बांगर, युवा नेते विजयसिंह बांगर, हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिनकर बांगर, यांच्यासह सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून स्पर्धकांना सर्व सुविधा पुरवणार असल्याचे देखील सुचवल आहे.
★विद्यालयाबरोबर गावाचेही नाव उंच केलं : सौ.सत्यभामाताई बांगर
हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी कबड्डी स्पर्धेत केलेली तालुका स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत कामगिरी अत्यंत अभिमानास्पद असून जालना येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये सुद्धा असाच विद्यालयाचा विजयाचा डंका कायम राहील आणि विद्यालयाबरोबर गावाचेही नाव अभिमानानं मोठं करतील असा विश्वास आहे. सर्व खेळाडू प्रशिक्षक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
– सौ.सत्यभामाताई बांगर
सरपंच भायाळा.
★खेळाडू प्रशिक्षक सर्व शिक्षक प्राध्यापकांचे अभिनंदन : प्राचार्य दिनकर बांगर
प्रथमता सर्व हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील कबड्डी संघाने मिळवलेल्या यशाबद्दल खेळाडू प्रशिक्षक शिक्षक प्राध्यापक यांच्या सर्व प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे त्याचबरोबर संस्थेकडून मिळाणार प्रोत्साहन आम्हाला देखील उत्साह देणार आहे त्यामुळे संस्थेचे आणि सर्व सहकार्य करणाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन…
– दिनकर बांगर
प्राचार्य हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भायाळा.
★विजयाचे शिल्पकार
खेळाडू आर्यन पोळकर, मनीष पोवार, ओमकार कातोरे, सोमनाथ दळवे, यश माने, अभिषेक काळबांडे, ओम ढवळे, ऋषिकेश उबाळे या सर्व खेळाडूंना संघ व्यवस्थापक नितीन गर्जे व कोच दिपराज जामदार या सर्वांच्या प्रयत्नातून हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाला यश मिळाल आहे.