23 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

रमाई योजनेचा 2 वर्षांपासून आलेला निधी कुठंय!

मुख्याधिकारी जातीय आकसापोटी निधी वाटप करीत नसल्याचा लाभार्थी महिलांचा गंभीर आरोप

पाटोदा / प्रतिनिधी

पाटोदा शहरातील रमाई आवास योजनेचे पुर्णतहा वाताहत झाली असुन रमाई आवास योजनेच्या लाभार्थींना दोन वर्षांपूर्वी न.प.खात्यावर रक्कम वर्ग असुन सुद्धा
अधिकाऱ्यांच्या जातिय आकसेपोटी दलित कुटुंबाला मागील दोन वर्षांपासून आपल्या हक्काच्या निवाऱ्या पासून वंचित राहावे लागत असून त्यामध्ये अनेकांना घरभाडे भरावे लागत असल्याने तारेवरची कसरत करावी लागत असल्याने रमाई आवास योजनेच्या लाभार्थी महिला आक्रमक झाल्या होत्या.महिलांनी दि.३जुलै सोमवार रोजी नगरपंचायत कार्यालय गाठत मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेणाचा मानस केला होता.मात्र मागील अनेक महिन्यापासून मुख्याधिकारी कार्यालयवर हजरच राहत नसल्याने आजही ते हजर नसल्याने कार्यालयीन अधिक्षक वक्ते साहेब यांना निवेदन देत लवकरात लवकर निधी वर्ग करा नसता लोकशाही मार्गाने पुढचे पाऊल उचलुत असा इशारा देण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. पाटोदा नगरपंचायत रमाई घरकुल योजनांचे बजेट दोन वर्षा वर्ग केलेला आहे.मात्र संबंधित मुख्याधिकारी यांनी याबाबतचा कसलाही जि.आर नसताना फक्त जातीय आकस मनात बाळगून खालील निवेदन देणाऱ्या महिलांचे चेक देण्यास टाळाटाळ करत आहेत. आपला या विषयावर मत स्पष्ट करावे कारण महिलांना ५०% आरक्षण असताना सुध्दा जाणिव पुर्वक कुणीतरी राजकीय नेत्यांच्या दबाखाली काम करत असाल तर आपणास हि गोष्ट कठीण जाईल.आपण तात्काळ आठ दिवसांत वर्ग करा नसता आम्ही लोकशाही मार्गाने पाऊल उचलु असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी वंदना दिलीप जावळे, हिराबाई नवनाथ जावळे,पल्लवी विलास जावळे,ज्योती अंमत जावळे,सत्याभामा सुनील जावळे यांच्यासह अनेक महिलां उपस्थित होत्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!