★मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ताल पाटोदा तालुक्यात सावळा गोंधळ करून मनमानी पुणे शासन निर्णय न पाहता केवळ महिला असल्याचे कारण सांगून सर्वात आधी अर्ज दाखल केलेला असताना देखील शैक्षणिक गुणवत्ता अधिक असताना देखील सदर योजनेतून दुसरेच उमेदवार भरती करून सावळा गोंधळ केल्याचा प्रकार सुरू आहे. याचा याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी उद्या पाटोदा पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन करणार आहे.
पाटोदा तालुक्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि सावळा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मार्फत पाटोदा पंचायत समिती कार्यालयाला 5 सप्टेंबर 2024 रोजी कुलूप ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. आज गटशिक्षण अधिकारी कार्यालय पाटोदा यांना निवेदन देऊन झालेल्या सावळ्या गोंधळाबद्दल जाब विचारण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप लावून निषेध नोंदविण्यात येणार आहे. या निवेदनावर गोरख झेंड जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब गायकवाड तालुकाध्यक्ष पाटोदा, हनुमंत धनवटे भारतीय भटका विमुक्त जाती जमाती विकास संघटना जिल्हाध्यक्ष, निळकंठ मस्के, परशुराम गायकवाड मा.उपसरपंच सौताडा, गोविंद यादव, नवनाथ गायकवाड, जनार्दन सरवदे, प्रदीप उबाळे इत्यादींनी स्वाक्षरी करून निवेदन दिले आहे.