★निकृष्ट बांधकामाची सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई ची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्या कडे घुगे व मोबीन शेख यांची मागणी
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा येतील मांजरा व साळ नदीच्या संगमावर चार-पाच महिने पूर्वी नवीन पूल बांधण्यात आला होता.सदरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तसेच आवश्यक ते खडी मुरूम, सिमेंट व लोखंड याचा वापर न झाल्यामुळे पावसाच्या पहिल्या पुरातच वाहून गेलेला आहे. या प्रकरणाची चौकशी करून, याला जबाबदार असणाऱ्या एजंसी वर फौजदारी व दिवाणी कारवाई करून, संबंधित गुत्तेदाराकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अबलूक घुगे, मोबीन हमीद शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटोदा येतील मांजरा व साळ नदीच्या संगमावर वर्षभरापूर्वीच नवीन पूल बांधण्यात आला होता. सदरील पुलाचे बांधकाम पाटोदा नगर पंचायत यांच्या मार्फत झाल्याचे कळालेले आहे सदरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तसेच आवश्यक ते खडी मुरूम, सिमेंट व लोखंड याचा वापर न झाल्यामुळे पावसाच्या पहिल्या पुरातच वाहून गेलेला आहे. तरी सदरील पुलाचे बांधकाम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केले आहे व ज्या इंजिनियर व अधिकाऱ्यांनी सदरचे कामकाजावर देखरेख केलेली आहे. त्यांच्यासकट मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत पाटोदा तसेच संबंधित नगरसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कारवाई करणे, संबंधित गुत्तेदाराकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी तसेच चौकशीमध्ये संबंधित इंजिनिअर यांची देखील विभागीय चौकशी करून त्यांच्यावर देखील प्रशासकीय कारवाई करावी नसता नाईलाजास्तव आम्हाला उच्च न्यायालयामध्यें याचिका दाखल करावी लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अबलूक घुगे, मोबीन हमीद शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.