9.5 C
New York
Thursday, April 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ.आजबेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतोय!

★अंमळनेर सर्कल प्रमुख मंगेश पवार यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षेच आयोजन

★या स्पर्धा परीक्षेत तालुक्यातील 32 शाळांनी 151 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

कुसळंब | प्रतिनिधी

आष्टी मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुसळंब येथे नवोदयच्या धरतीवर पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचा आयोजन केलं जातं. या वर्षी देखील स्पर्धा परीक्षेचा आयोजन केलं होतं यामध्ये पाटोदा तालुक्यातील 32 शाळांनी सहभाग नोंद आला होता तर दीडशेच्या वर विद्यार्थी स्पर्धेसाठी बसले होते या कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांची विशेष उपस्थिती असून कुसळंब मधील सर्वच आजी-माजी जेष्ठ नेते पाटोदा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते मित्र मंडळ मोठे संख्येने उपस्थित होते.
कुसळंब गाव म्हटलं की काहीतरी वेगळेपणा आलाच. त्यातीलच एक भाग म्हणजे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी घेण्यात येत असलेला स्पर्धा परीक्षेचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम म्हटलं तर वाव वाटायला नको कारण की या स्पर्धेसाठी पाटोदा तालुक्यातून अनेक शाळा सहभाग नोंदवतात तर शंभर दीडशे च्या वर विद्यार्थी सहभागी होतात.. त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसांचाही वर्षाव केला जातो मग पाचशे रुपये पासून ते पाच हजारापर्यंतची बक्षीस या स्पर्धा परीक्षेसाठी दिले जातात तर सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह रोख रक्कम देऊन सन्मानित केले जाते. त्याच पद्धतीने यावर्षीही विद्यार्थ्यांना बक्षीस बरोबर सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब आजबे काका यांची विशेष उपस्थिती होती त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक दादा घुमरे, खंडेश्वर विद्यालयाचे संस्थापक किसनराव पवार बापू, माझी जिल्हा परिषद सदस्य शिवनाथ अण्णा पवार, श्रीहरी काका पवार, महादेव दादा पवार, मेजर शिवाजी पवार, अण्णासाहेब लवांडे, गोवर्धन आप्पा सानप,आबासाहेब पवार, भीमराव सरोदे सर, अतुल अण्णा शेलार, राजेंद्र सकुंडे, अविनाश पवार, अशोक पवार सरपंच, बाबुराव आण्णा धारक, सुभाष पोकळे, नवनाथ पवार, समीर शेख, डॉ. शिवाजी पवार, किरण पवार, परसराम पवार, उमेश पवार, एकनाथ पवार, सतीश पवार, बाबू पवार, विलास पोले, कृष्णा गंडाळ, अमीन शेख, राजेंद्र पोकळे, मुरलीधर तांबे, केदारनाथ येवले, पंकज पवार, नामदेव पवार, काकासाहेब पवार, संजय घोशिर, शिवाजी घोषिर, नाना कवठेकर, कैलास पवार, दत्ता पवार, राहुल वाळुंजकर, सुशांत पवार, राम पवार, महेश पवार यांच्यासह कार्यकर्ते मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायके सर व शेलार सर यांनी केले व प्रस्तावना मंगेश पवार तर आभार प्रदर्शन सचिन पवार यांनी व्यक्त केले.

♦माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात समाज हिताचे कामे

आमदार झाल्यापासून नक्कीच समाज हिताच्या कामाला मी प्राधान्य दिले असून दूरदृष्टी ठेवून समाजाच्या हिताची कामे कशी केली जातील तो माझा प्रयत्न राहिला आहे मग व्यायामासाठी जिम असतील किंवा सर्वसामान्य गरिबांची छोटे-मोठे कार्यक्रम लग्न समारंभ करण्यासाठी सभामंडप असतील रस्ते असतील ब्लॉक असतील स्मशानभूमी असतील यावर जास्त भर देऊन आमदारकीचा पूर्ण उपयोग समाजहितासाठी करण्याचा पहिल्यापासूनच माझा हेतू राहिला आहे यापुढे देखील समाजाच्या हिताचे काम होतील यात शंका नाही आणि विशेष करून येणाऱ्या काळात शिक्षणावर अधिक भर देण्याचा माझा मानस आहे.
– आमदार बाळासाहेब आजबे काका
आष्टी विधानसभा मतदारसंघ.

♦विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळण्यासाठी चा उपक्रम

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरे केल्या जातात त्यातीलच हा एक उपक्रम असून इतर कार्यक्रमापेक्षा वेगळा आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होते त्यामुळे प्रथमता आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आयोजित करणारी मंगेश पवार यांचे आभारही या ठिकाणी व्यक्त करतो.
– किसनराव बापू पवार
संस्थापक खंडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुसळंब.

♦वाढदिवसातून सामाजिक जपणं कर्तव्य!

वाढदिवस हे सगळेच करतात केलेही पाहिजेत परंतु त्यातून सामाजिक साध्य करणे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळेच आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त समाज हित समोर ठेवून आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचा आम्ही दरवर्षी आयोजन करतो त्यातून नक्कीच विद्यार्थ्यांना आणि पालकांना अधिक प्रोत्साहन मिळते आणि येणाऱ्या नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षा ला सहजासहजी विद्यार्थी सामोरे जातात त्यामुळे या स्पर्धा परीक्षा अशाच आम्ही यापुढे देखील घेत राहू आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत राहो ह्याच आमदार काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत…
– मंगेश पवार
गटप्रमुख अंमळनेर सर्कल.

♦बक्षिसे आणि विजेते!

★प्रथम बक्षीस दीपक दादा घुमरे 5 हजार रुपये. विजेता जिल्हा परिषद शाळा खेरला वेदांत विजय तांबे.
★द्वितीय बक्षीस युवराज झुनगुरे 4 हजार रुपये, विजेता जिल्हा परिषद शाळा पारगाव घुमरा हर्षद हरिदास घुमरे.
★तृतीय बक्षीस जुनेद शेख 3 हजार रुपये, विजेता जिल्हा परिषद शाळा डोंगरी प्रणव अर्जुन जगताप.
★चतुर्थ बक्षीस किरण पवार 2 हजार रुपये, विजेता जिल्हा परिषद शाळा डोमरी आरोही सोमनाथ डोके.
पाचवी बक्षीस संजय घोषीर 1 हजार रुपये, विजेता जिल्हा परिषद शाळा डोमरी आयुष गजानन माने.
★उत्तेजनार्थ बक्षीस परसराम पवार पाचशे रुपये, विजेता खंडेश्वर विद्यालय कुसळम तन्मय गोरक्षनाथ भराटे.
★उत्तेजनार्थ बक्षीस राजेंद्र सुकुंडे पाचशे रुपये, विजेता माध्यमिक विद्यालय मुगगाव यशश्री युवराज भवर.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!