गणेश मळेकर यांचा राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा
पाटोदा | प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पाटोदा तालुका कार्यकारणीवर डोंगरकिन्ही येथील गणेश मळेकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्यांनी नुकताच आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा युवक अध्यक्ष युवराज झुनगुरे यांच्याकडे पाठवला आहे राजीनामा देण्याचं कारण अद्याप तरी कळलेलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्य जरी असली तरी युवक आपल्या पदाची राजीनामे का देतात याचा उलगडा अद्याप तरी झालेला नाही. पाटोदा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदाचा कारभार गणेश मळेकर हे पाहत होते परंतु त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा नुकताच तालुका अध्यक्ष कडे देऊन आपली नाराजी म्हणावं की काय ? अशा पद्धतीने राजीनामा दिला असल्याने चर्चेला उधाण आले आहे.