★राष्ट्रवादीच्या अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या आष्टी-पाटोदा-शिरूर च्या अध्यक्षपदी हनुमंत अण्णा पवार यांची निवड
पाटोदा | प्रतिनिधी
राष्ट्रवादी अध्यात्मिक वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य आयोजित चला वारकरी संमेलनाला या कार्यक्रमांमध्ये पाटोदा तालुक्यातील आदर्श गाव कुसळंबचा मान वाढला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची विशेष उपस्थिती होती यांच्या उपस्थितीमध्ये कुसळंब येथील सांप्रदायिक क्षेत्रातून आपली वेगळीच ओळख ज्यांनी आपल्या गायनातून निर्माण केली ते हनुमंत अण्णा पवार यांची आष्टी पाटोदा शिरूर मतदार अध्यक्षपदी निवड करून कुसळंब वासियांना सांप्रदायिक क्षेत्रात अधिक पुढे काम करण्याची संधी मिळाली आहे.
पाटोदा तालुक्याला राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. कुसळंब येथील हनुमंत अण्णा पवार यांनी आपल्या गायनाने आणि अध्यात्मिक क्षेत्राच्या विशेष गुणामुळे त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात सांप्रदायिक क्षेत्रामध्ये वारकरी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तो होत नसल्याचं खंत देखील व्यक्त होत आहे परंतु ती भरून काढण्यासाठी काम करणार असल्याचे देखील हनुमंत अण्णा यांनी सांगितलं तर येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून सांप्रदायिक वारकरी क्षेत्रात जे शक्य असेल ते काम पक्षाकडून करून घेण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू असे देखील सांगितला आहे.
★कुसळंब गाव सांप्रदायिक क्षेत्रात देखील पुढे येणार
कुसळंब गाव नेहमी सगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करून आपली वेगळीच ओळख निर्माण करणारा गाव म्हणून ओळखलं जातं आता सांप्रदायिक क्षेत्राचं आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच अध्यक्ष पद मिळाल्याने पक्षाच्या माध्यमातून सांप्रदायिक क्षेत्रात वारकरी संप्रदाय क्षेत्रात आपलं योगदान मोठं असलं पाहिजे या हेतून गाव काम करून पक्षाकडून सांप्रदायिक क्षेत्रासाठी वारकऱ्यांसाठी काही विशेष काही करता येईल का त्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष हनुमंत अण्णा पवार यांनी सांगितले आहे…