★पाटोदा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत भगवान महाराज विद्यालय सावरगाव घाट शाळेचे यश!
कुसळंब | प्रतिनिधी
भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगांव घाट ता पाटोदा येथील विद्यार्थी पै.इम्रान पठाण याने दि.27/08/2024 रोजी पाटोदा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 17 वर्ष,वयोगटात 60 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला.पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत भगवान महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट येथील पै.इम्रान पठाण या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवत शाळेचे नाव उंचावला आहे, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.रामकृष्णजी बांगर साहेब,सचिव सौ.सत्यभामाताई बांगर,गटशिक्षणाधिकारी श्री.बोंदार्डे साहेब,केंद्रप्रमुख म्हस्के सर,मुख्याध्यापक श्री.बी टी खाडे साहेब,मा.रामचंद्र सानप सर,श्री.लांबरूड सर,मुबारक शेख,रशीदसेठ शेख,क्रीडा शिक्षक के आर सिरसाट सर,अशोक वनवे सर, व्ही एन बांगर सर,प्रा.एस एस जायभाये सर,प्रा.आघाव सर, आरिफ शेख सर,एम एन बांगर सर,श्री बारगजे सर,श्री.विकास सिरसाट सर,श्री नागरगोजे सर,श्री.कापसे सर,बी एम सानप सर,यांनी पुढील स्पर्धेसाठी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.