★पाटोद्यात आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्या व मोफत सायकल वाटप
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप तसेच लावणी सम्राज्ञी पुनम कुडाळकर यांचा सदाबहार लावणी कार्यक्रम गुरुवार दिनांक 29/8/2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नगरपंचायत कार्यालय पाटोदा येथे आयोजित केला असून उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते जुनेद शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
पाटोदा तालुक्यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे टाका यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विशेष करून युवा नेताजी न्यूज शेख यांच्याकडून आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप तसेच मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता लावण्याचा कार्यक्रम पाटोदा नगरपंचायत कार्यालय समोर होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आव्हान जुनेद शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.