★कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जयदत्त धस मित्र मंडळाचे आव्हान
आष्टी | प्रतिनिधी
अस्थिवासीयांना यावर्षी दहीहंडी महोत्सवाला महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अभिनेता येणार असून येत्या बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी आष्टी शहरात होणार असून आष्टीसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान युवा नेता जयदत्त भैय्या धस मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आष्टी शहरातील पंचायत समिती प्रांगणात बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता जयदत्त भैया धस मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवासाठी माजी मंत्री सुरेश अण्णा यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लावण्य तारखा मानसी नाईक, सिने अभिनेत्री मांजरेकर, अभिनेत्री झेबा शेख यांची प्रमुख उपस्थिती असणारा आहे, तरी या महोत्सवामध्ये डीजेच्या तालावर तरुणाई फिरकणार असून या कार्यक्रमासाठी निशा कुसेकर ही प्रसिद्ध सूत्रसंचालिका या महोत्सवाचे सूत्रसंचालन करणार आहे, तर या दहीहंडी उत्सवाचे इव्हेंट बीड येथील सुप्रसिद्ध ड्रीमलॅंडचे रविराज जेधे हे करणार आहेत. दहीहंडी महा उत्सवाची जय तयारी सुरू असून आष्टी शहरात होणाऱ्या या दहीहंडी महाउत्सवाला आष्टी तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवण्याचे आव्हान युवा नेता जयदत्त भैय्या धस मित्र मंडळाच्या वतीने शरद भगत, अनिल शेबडे, विशाल धस, आनंद वाहटूळे, भाऊ गायकवाड, गौतम पारखे,महेश मधुरकर, शुभम लोखंडे, ऋषीं धस राहुल वारंगुले,मनोज धोंडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
★सुप्रसिद्ध अभिनेत्री येणार ; नागरिकात उत्साह वाढला!
युवा नेते जयदत्त भैय्या धस आयोजित दहीहंडी महोत्सव 2024 मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून दहीहंडी पाहण्यासाठी आष्टीसह पाटोदा शिरूर जामखेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक येणार असल्याची प्राथमिक माहिती असून हा उत्सव आगळावेगळा आणि मोठा आणि नागरिकांच्या उत्साहात भर टाकणारा असल्याचा सुद्धा बोलला जात आहे. या दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबद्दल नागरिकांकडून जयदत्त भैय्या धस यांचे कौतुक व धन्यवाद केले जात आहे..