★ढोल-ताशा गाजत वाजत, फुलांची उधळण करत जनतेकडून आबांचे स्वागत
आष्टी | प्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे यांनी सध्या आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये गाव भेट दौरा सुरू केला असून या दौऱ्याला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे बऱ्याच ठिकाणी गाजत वाजत फुलांची उधळण करत आतिश बाजी करत जनतेकडून सतीश शिंदे यांचे स्वागत केलं जात असून आमदारकीसाठी एक प्रकारे शुभ संकेतच मिळत असल्याचं चिन्ह दिसत आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद गटांमध्ये सध्या पै. सतीश आबा शिंदे यांचा गाव भेट दौरा सुरू आहे. या दौऱ्यामध्ये जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने भेटीगाठी सर्वच नेत्यांच्या सुरू आहे परंतु पै. सतीश आबा शिंदे यांची गाव भेट म्हणजे आपुलकीची जिव्हाळ्याची आणि हक्काची आहे याच पद्धतीने जनतेकडूनही त्यांचं तितक्याच उत्साहाने स्वागत केले जात आहे. आज आष्टी तालुक्यातील धानोरा गट शिरापुर,चिंचोली,साबलखेड ,धानोरा,हिवरा,पिंपरखेड,सुलेमान देवळा, दादेगाव, डोंगरगण,देविनिमगांव, येथील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांच्या विविध अडीअडचणी समस्या समजून घेतल्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच येणाऱ्या प्रत्येक अडचणी ह्या माझ्या अडचणी समजून तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी येणाऱ्या काळात माझ्यावर यावी हीच अपेक्षा व्यक्त केली.
★दौरा गाव भेटीचा ; शुभ संकेत आमदारकीचे!
आष्टी मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज पर्यंत जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे नेहमीच खंबीरपणे उभे राहिले असून सध्या गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील दिशा काय असावी काय असेल याचं हितगुज करण्यासाठी संवाद दौरा सुरू आहे यामध्ये पै.सतीश शिंदे यांना आमदारकीसाठी शुभ संकेत मिळत असल्याचे सुद्धा दिसत आहे..