14.1 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोण काय म्हणतय यापेक्षा आपण जनतेच्या समस्या सोडवण्याला महत्त्व देतो – आ.बाळासाहेब आजबे

★गाव भेट दौरा आणि विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आ.आजबेंच विरोधकांना आव्हान

आष्टी | प्रतिनिधी

मतदार संघात आजपर्यंत आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करून आणली आहेत गावागावात विकास कामे झाली असून काही मंजूर कामांचा नारळ फोडणेचा कार्यक्रम गाव भेट दौऱ्यामध्ये होत आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत या योजना प्रत्येक गावामध्ये सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्याचबरोबर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत आपण गावात केलेली विकासकामाचे लोकार्पण व मंजूर कामांचे उदघाटन करणे व ही कामे जनतेला माहिती व्हावेत या उद्देशाने हा गाव भेट दौरा सुरू आहे परंतु विरोधकांकडून मी करत असलेल्या मंजूर कामांच्या उद्घाटनाबाबत टीका केली जात आहे, कोण काय म्हणतंय यापेक्षा आपण जनतेच्या समस्या सोडवण्याला महत्त्व देत असून योग्य वेळी आपण सर्व आरोपांना सविस्तर उत्तर देऊ असे आमदार बाळासाहेब आजबे यांनीआष्टी तालुक्यात सलेवडगाव येथे गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलताना सांगितले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सुरू असून शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दौलावडगाव गणातील गाव पेठ दौरा संपन्न झाला यावेळी त्यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे ज्येष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे, परसराम आबा मराठे ,महादेव डोके ,माजी सभापती संतोष गुंड ,पप्पू गवळी,बबन रांजणे रामहरी ठोंबरे विठ्ठल नागरगोजे यांची प्रमुख उपस्थितीत होती, पुढे बोलताना आ आजबे म्हणाले कि गेल्या पाच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये आपण मतदारसंघांमध्ये मूलभूत गरजा लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा पाणी ,रस्ते विजेचा प्रश्न प्रामुख्याने हाताळत तो कसा सोडवता येईल यासाठी प्राधान्यानेअनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपयांचे बंधाऱ्याची कामे मंजूर केली आहेत तर पांदण रस्ता योजनेच्या माध्यमातून 500 पेक्षा जास्त रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे त्याचबरोबर इतर विकास कामे मोठ्या प्रमाणात केली.
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सध्या सुरू असून शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी अंभोरा, सालेवडगाव, दौलावडगाव, बांदखेल, केळ, पिंपळगाव, मराठवाडी, हरेवाडी या ठिकाणी ग्रामस्थांची भेटी देऊन पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन आपण पाच वर्षात केलेली कामे त्या कामांचे लोकार्पण व उद्घाटन करून ती कामे लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम या दौऱ्याच्या निमित्ताने केली जाणार आहे ,त्याचबरोबर शासनाने ज्या लोक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत त्या योजनांची माहिती ग्रामस्थांच्या भेटी गाठी घेण्यासाठी व गावात झालेल्या कामांची माहिती लोकांना व्हावी म्हणून हा दौरा आयोजित केला आहे लाडकी बहीण योजना, सौर पंप योजना ,मोफत गॅस योजना , मुलींसाठी मोफत शिक्षण योजना यासारख्या शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा जनतेने लाभ घ्यावा व कार्यकर्त्यांनी ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करावे शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांचा पीक पेरा लावून घ्यावा जेणेकरून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळण्यास मदत होईल, गेल्या पाच वर्षांमध्ये आपण कोणाचे वाईट होईल असे कोणतेही काम केले नाही, आमदार हा लोकांच्या समस्या सोडण्यासाठी असतो समस्या निर्माण करण्यासाठी नसतो म्हणून पाच वर्षाच्या काळात आपण भावाभावात किंवा गावागावात भांडण लावण्याचे काम केले नसून आपसातील भांडणे मिटवण्याचे प्रामाणिक काम केले आहे म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यामध्ये शांतता नांदत आहे, आपण गेल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघात जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून आणून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे मतदारसंघातील गाव ,वाडी ,वस्ती या प्रत्येक ठिकाणी विकास कामे झालेली आहेत कोणत्याही कामांमध्ये अनियमितता झालेली नसून लोकांना विकास कामे दिसत असल्यामुळेच लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी बोलतान सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे हरिभाऊ दहातोंडे परसराम मराठे संतोष गुंड सिताराम दहातोंडे चेअरमन सेवा सोसायटी विठ्ठल नागरगोजे सरपंच विठ्ठल आडसरे बबन रांजणे मामा ठोंबरे मामा महादेव डोके पप्पू गवळी दिनेश डोके रामकिसन दहातोंडे सतीश कोहक, भास्कर दहातोंडे संतोष शिंदे, बशीर मामू शेख भास्कर कराळे शिवाजी चौबे दादा शिंदे आदित्य जगताप घोडके मामा राज आटोळे बंडू खकाळ, संतोष खकाळ ठोंबरे मामा पप्पू गवळी अमोल ठोंबरे माजी सरपंच फसले सर आजिनाथ फसले मेजर शामराव फसले बबलू शेठ सतीश कोहक मीरा मामू शेख लक्ष्मण दादा फसले अडबले मेजर जुलेखा मिस्तरी विठ्ठल नागरगोजे रावसाहेब दळवी सरपंच सौ कौशल्य फसले सौ सविताआडबले सौ मालक कोहक,सौ अलका अडबले उषा अडबळे,, केशर आडबले, विशाल झांबरे सरपंच संपत झेंडे आबासाहेब परभणे भीमराज परभने संभाजी कोलते उपसरपंच बबलू शेठ गोविंद इथापे अशोक माळी संतोष मुळे मधुकर कोलते अशोक कोलते शिवाजी परभणे बाळासाहेब उचाळे राहुल परभणे दत्तू परभणे भाऊसाहेब परभणे यांच्यासह गणातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!