ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा यांच्या जन्मोत्सव सोहळ्यास आज प्रारंभ
सावरगांव घाट | प्रतिनिधी
ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा यांच्या १२८ व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयार बाबांची जन्मभूमी श्रीक्षेत्र सावरगांव घाट ता.पाटोदा (भगवान भक्तीगड) येथे पूर्ण झाली असून दोन दिवस हा सोहळा चालणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य उपस्थिती पालकमंत्री श्री.धनंजयजी मुंढे,आ.पंकजा मुंढे,मा.खा प्रितम मुंढे, मा.खा सुजय विखे,आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.सुरेश धस,मा.आ.भिमराव धोंडे,आ.सुनिल शेळके, मा.वाल्मिक कराड यांची उपस्थिती राहणार आहे.
शुक्रवार दि.२३/०८/२४ रोजी हभप सुदर्शन महाराज खाडे पाटण सांगवी संस्थान याच्या शुभहस्ते दु.०३:०० वाजता कलश पूजनाने कार्यक्रमाला सुरवात होणार असून याच दिवशी सायं.०४ ते ०६ हभप काशिनाथ महाराज गणेशगड यांचे प्रवचन आणि रात्री ०९ ते ११ हभप सोपान महाराज सानप यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दिनांक २४/०८/२४ रोजी सकाळी सहा वाजता घरोघरी गुढ्या उभारून व बाबांच्या मूर्तीचा जलाभिषेक करून बाबांची आरती होईल व नंतर जन्मोत्सवास प्रारंभ होणार आहे. सकाळी ०७:३० ते १०:३० संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे नंतर सकाळी ११ ते १ हभप विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे अमृतुल्य काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.या कार्यक्रमाचे अतिशय भव्यदिव्य असे नियोजन आयोजक जय भगवान युवा प्रतिष्ठन व ग्रामस्थ सावरगांव घाट यांनी केले असून सर्व भाविक भक्तांची सोय व्हावी यासाठी अतिशय मोठा व वॉटरफ्रुप मंडप लावण्यात आला आहे.या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन जय भगवान युवा प्रतिष्ठन यांच्या वतीने करण्यात आले आहे.