★योजना सुरळीत होत नसेल तर बंद करा ; पाटोदा तालुक्यातील बहिणींची मागणी
[ मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीच्या मदतीला धावले शेतकरी नेते गणेश कवडे ]
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेमधून महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत परंतु हेच दीड हजार मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीला फॉर्म भरण्यासाठी काहींना केवायसी करण्यासाठी तर काहींना आधार लिंक करण्यासाठी दोन-चार दिवस चक्र माराव्या लागत असून दीड हजारापेक्षा जास्त खर्च होत असून मानसिक त्रास आर्थिक नुकसान देखील होत आहे, मग लाडक्या बहिणीला इतका त्रास होत असेल तर मग लाडकी बहीण कशाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटोदा तालुक्यातील मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींचे दुःख जाणून घेण्यासाठी शेतकरी नेते गणेश कवडे धावून आले असून व्यथा ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना व तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जरी लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी त्या योजनेत अनेक अडचणी येत असून अनेक महिलांना याचा फायदा देखील होताना दिसत नसून मग इतका त्रास असेल तर लाडकी बहीण म्हणता का ? हा प्रश्नही उपस्थित पाटोदा तालुक्यातील महिलांनी केला आहे. योजना सुरळीत चालू करायची नसेल तर तात्काळ बंद करा आणि लाडक्या बहिणीला सुखानं जगू द्या असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाटोदा तालुक्यातील एसबीआय बँक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दररोज 300 ते 400 महिला येत असून फक्त 50 महिलांचे हेच काम होत असताना दिसत आहे. या महिलांच्या तक्रारी येऊ लागल्याने शेतकरी नेते गणेश कवडे यांच्या कानावर हा विषय गेला आणि त्यांनी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धाव घेत महिलांची विचारपूस केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सूचना करून बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनाही या संदर्भात माहिती देऊन त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून महिलांना कसलीच अडचण येणार नाही याची खबरदारी घ्या असे देखील सांगितले आहे.
★गणेश कवडे यांचा खासदार बजरंग बप्पांना फोन तर बप्पांचा अधिकाऱ्यांना फोन
पाटोदा तालुक्यातील महिलांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म केवायसी आधार लिंक करण्याचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बँकेमध्ये दररोज 300 ते 400 महिला येत असून फक्त 40 ते 50 महिलांचे काम होत असून इतर महिलांना वापस जावं लागत आहे दोन चार दिवस झालं या महिला चकरा मारत असून योजनेच्या पैशापेक्षा स्वतःचे पैसे जास्त खर्च होत असल्याने महिलांनी शेतकरी नेते गणेश कवडे यांना फोन करून ची अडचण सांगितली तात्काळ गणेश कवडे यांनी धाव घेत खासदार साहेबांना फोन करून हा विषय सांगितला तर खासदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना करून लवकरात लवकर सुरळीत करा असे आदेशही दिले आहे.
★संबंधित बँक अधिकारी आणि तहसीलदार यांना योजनेबाबत निवेदन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या फॉर्म भरणा प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात अडचण येत असून बँकेमध्ये महिलांना मानसिक आर्थिक त्रास होत आहे याबद्दल शेतकरी नेते गणेश कवडे यांनी संबंधित बँक अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन योजनेची प्रक्रिया सुरळीत करावी अन्यथा बंद करा असंच डायरेक्ट आवाहन केले असून महिलांना अडचणी येणार नाहीत यासाठी तात्काळ योग्य ते पाऊल उचलून योजना सुरळीत होऊन त्यांच्या खात्यावर पैसे मिळावेत अशी मागणी केली आहे.