जागतिक स्तरावरील ऑनलाइन लर्न अँड अर्न इंडिया संयुक्त पनामा
★जागतिक अबॅकस स्पर्धक मानद साईटेशन
बीड | प्रतिनिधी
अबॅकस गणित तंत्र म्हणजेच सर्वांगीण विकास होय. विविध स्पर्धेमधूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना शैक्षणिक वातावरण निर्मिती करून देणे आवश्यक आहे, शालेय स्तरावरील सर्वांगिन विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. अनन्या काशिनाथ मोरेने जागतिक स्तरावरील अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्कृष्ट रँकिंग मिळवून ऐतिहासिक यश मिळवलेले आहे. शहरातील अबॅकस ट्रेनिंग केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. अनन्या काशिनाथ मोरेने लर्न अँड अर्न इंडिया तसेच यु अँड इ म्यानमार पनामा अबॅकस, स्किल डेव्हलपमेंट आणि इंटरनॅशनल स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप आणि आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशन यांच्या सहकार्याने जागतिक स्तरावरील अबॅकस स्पर्धा जुलै 2024 संपन्न झालेल्या असून त्यामधील जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे अनन्या काशिनाथ मोरेने सर्वोत्कृष्ट विनर प्रमाणपत्र मिळालेलं आहे. जागतिक स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये भारतासह, नेपाळ, श्रीलंका, यु एस ए , म्यानमार, श्रीलंका, न्युझीलँड, पनामा, इंडोनेशियाअशा जगातील दोन हजार एकूण विद्यार्थ्यांपैकी सहभाग असलेल्या अबॅकसच्या पहिल्या कॅटेगिरी लेवलच्या स्पर्धेमध्ये अनन्या काशिनाथ मोरेची जागतिक स्तरावर निवड झालेली आहे . बीडच्या सुपर जिनियस विद्यार्थ्यांमध्ये अनन्या काशिनाथ मोरेची इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये किड्स स्तरावरील प्रतिष्ठित समजले जाणारी अबॅकस इंटरनॅशनल सर्वोत्कृष्ट जागतिक उत्कृष्ट स्पर्धक निवड करण्यात आलेली आहे. अनन्या काशिनाथ मोरेने फक्त दहा मिनिटांमध्ये अगदी बरोबर गणिते सोडवून पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून ऐतिहासिक विक्रम केलेला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून सतत प्रयत्न करत असल्यामुळे तसेच पालकांनी, शिक्षकांनी सतत योग्य ते मार्गदर्शन करून यश प्राप्त करण्यास सहकार्य केलेली आहे. अबॅकस तथा वैदिक गणित मार्गदर्शक डॉ.एस ए घोडके यांनी अनन्याला सतत गणितामधील असलेल्या अडचणी दूर करण्यास प्रयत्न केलेले आहे. अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए. अनन्या काशिनाथ मोरेचे अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून अनन्या काशिनाथ मोरेचे, तिच्या शाळेतील मुख्याध्यापक प्रशासकीय अधिकारी आणि नातेवाईक द्वारे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. जागतिक स्तरावरील 22 ऑक्टोबर 2024 जपान जागतिक अबॅकस चॅम्पियनशिप अनन्या काशिनाथ मोरेची निवड झालेली आहे असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.
★विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्मरणशक्ती वाढीसाठी अबॅकसचा उपयोग
अबॅकस आणि वैदिक मॅथमुळे विद्यार्थ्यांचा गणितामधील आवड निर्माण होऊन गणिताबद्दलची मनात असलेली भीती नष्ट होऊन अनेक क्लिष्ट अशा गणितीय पद्धती सोप्या पद्धतीने सोडवल्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्मरणशक्ती यांचा विकास करण्यासाठी अबॅकसचा उपयोग केला जातो असे जिल्हा अबॅकस वितरक घोडके एस ए यांनी सांगितले आहे.