★पाटोदा तालुक्यातील सर्व शाळांना सहभाग घेण्याचे निमंत्रण
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाटोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून शैक्षणिक व बौद्धिक कलागुणांना वा मिळावा व ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडावी या उद्देशाने इयत्ता 5 वी चे जे विद्यार्थी नवोदय परीक्षा करिता बसणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नवोदयच्या धरतीवर तालुकास्तरीय नवोदय पूर्व सराव टेस्ट 100 गुणाच्या परीक्षेचा आयोजन करण्यात आले असून यातून मुलांना नवोदय परीक्षा विषय आत्तापासूनच सराव प्रश्नांचा आकलन होण्यासाठी मदत होईल व उत्सुकता वाढेल या हेतून काकांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेचा आयोजन केले असून सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेर गटप्रमुख मंगेश पवार यांनी केले आहे.
पाटोदा तालुक्यातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांना वाव मिळावा आणि वाव मिळावा आणि ज्ञानात भर पडावी या हेतून दरवर्षी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे याही वर्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले असून 30 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा आयोजन केले असून खंडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुसळंब येथे या स्पर्धा होणार असून या स्पर्धेत पाच हजारापासून एक हजारापर्यंत बक्षीस ठेवण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंमळनेर सर्कल गटप्रमुख मंगेश पवार यांनी केले आहे.
★स्पर्धेचे बक्षीस व व बक्षीस देणाऱ्यांची नावे
प्रथम बक्षीस दिपकदादा घुमरे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पाटोदा 5000 रुपये, द्वितीय बक्षीस युवराज झुनगुरे युवक तालुका अध्यक्ष पाटोदा 4000 हजार रुपये, तृतीय बक्षीस जुनेद शेख शहराध्यक्ष पाटोदा 3000 हजार रुपये, चतुर्थ बक्षीस किरण पवार उपसरपंच कुसळंब 2000 हजार रुपये, पाचवी बक्षीस संजय घोसीर युवा नेता कोतन 1000 रुपये या पद्धतीने बक्षीस व देणाऱ्यांची नावे आहेत.
★स्पर्धेचे ठिकाण, वेळ, दिनांक
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धस परीक्षेचे ठिकाण श्रीक्षेत्र खंडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुसळंब येथे दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे, तरी नियोजित वेळेत नियोजित ठिकाणी सर्व शाळेतील सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे…
★नोंदणीसाठी संपर्क
प्राचार्य एस के पवार सर
9423471952
पर्यवेक्षक शेलार सर
9637376900
मंगेश पवार
9503241183
किरण पवार
9545946790
सचिन पवार
9921801919
परसराम पवार
9764218847