★आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघातील जनतेच्या तोंडी फक्त शिंदेंचे नाव!
आष्टी | प्रतिनिधी
येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित गाव दौरा भेट सुरू केला आहे, या दौऱ्याला धामणगाव गटातील दौऱ्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळतोय तसेच या संवाद दौऱ्यामध्ये ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात येत आहे, तेथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत असून तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे असं आश्वासन आबाकडून मिळत आहे. अगोदरच्या विधानसभा निवडणूक मध्ये माघारी घेतली, तशी माघारी घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, व तुमच्या शिवाय आष्टी मतदारसंघाला दुसरा पर्याय नाही, तुम्हीच जनतेचे प्रश्न सोडू शकतात, तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडतान अशी अपेक्षा जनता बोलून दाखवत आहे. गनगेवाडी, खलाटवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमांना दौऱ्यानिमित्त भेट दिली. धामणगाव गटातील बीडसांगवी, किन्ही, बावी, खलाटवाडी, हातोला, धनगरवाडी, कापसी, डोईठाण, सांगवी (पा), कारखेल बु, हातोला, कापशी, डोईठण, या गावांना भेटी दिल्या. गाव भेट दरम्यान नागरिकांचा चांगलाच प्रकारे प्रतिसाद दिला. या दौऱ्याला प्रत्येक गावातून तितकाच उत्साहाने प्रतिसाद मिळत असून जनतेने आता एक प्रकारे ठरवलंच आहे की काय येणारा आमदार हा सतीश शिंदेच असणार असे चिन्ह उभा राहत असल्याचे दिसत आहे.
★आष्टी तालुक्यातील दौऱ्याला जनतेकडून उदंड प्रतिसाद!
आष्टी आणि पाटोदा तालुक्यामध्ये पैलवान सतीश आबा शिंदे यांचा दौरा सुरू असून दोन दिवस असती दोन दिवस पाटोदा असे दौरे सुरू आहेत सध्या आष्टीतील दौऱ्याला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळत असून येणारी आमदारकी हे आबा तुमच्याच गळ्यामध्ये पडणार आहे पण तुम्ही फक्त जनतेचे काम करण्यासाठी कमी पडू नका तुम्ही पडत नाहीत आणि यापुढेही पडू नका अशा अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.