★दौरा गाठीभेटीचा ; जनतेकडून मात्र आमदारकीसाठी शुभेच्छा
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत संवाद साधला. हा दौरा जरी गाठीभेटीचा असला तरी पाटोदा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आहे. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने गाव भेट दौरा आयोजन करून प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पै.सतीश आबा शिंदे यांनी कामे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्याला लोकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून आमचे पुढचे आमदार तुम्हीच अशी चर्चाही युवकांमध्ये दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलाही पक्ष तिकीट देऊ, अथवा न देऊ, आबांनी निवडणूक लढवावी अशी मागणी युवकाकडून होत आहे. नायगाव, पिठ्ठी, लिंबादेवी, उखंडा, निरगुडी, डोमरी धसपिंपळगाव, सगळेवाडी, गारमाथा तसेच अनेक गावांमध्ये भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पिठी गणातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★दौरा गाठीभेटीचा चर्चा आमदारकीची
आष्टी मतदार संघातील चर्चित असणारा चेहरा म्हणजे पै. सतीश आबा शिंदे यांनी अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेची नाळ जोडून आपले काम सुरू केले आहे त्यांच्या कामाला यश देखील मिळत असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम आहेत असं जनतेला वाटत आहे. यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी रिंगणात उतरावं अशा चर्चा पै.सतीश शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यातून समोर येत आहेत.
★पाटोदा तालुक्यात सतीश शिंदे यांच्या नावाला पसंती
पै. सतीश शिंदे यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात गाव भेट दौरा सुरू केला आहे. नुकताच पाटोदा तालुक्यातील काही गावांना भेटी दिले असतात गावातील जनता युवक नागरिक यांच्याकडून सतीश शिंदे यांना आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या जात असून त्यांचं गावागावांमध्ये जंगी स्वागत केले जात आहे. फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांना आत्ताच आमदारकीसाठी शुभेच्छा देऊन तुम्ही आमदारकी लढवावी अशा अपेक्षा देखील व्यक्त केल्या जात आहे…