★पिंपळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची शाखा स्थापन
आष्टी | प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गावागावात युवकांची फळी तयार करणार असून आजचा युवक हा व्यसनाकडे चालला असून त्याला रोखण्याचे महत्त्वाचे काम आपण या माध्यमातून करणार असून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची शाखा स्थापन करणार असल्याचे मत युवानेते यश आजबे यांनी पिंपळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.
पिंपळा येथे युवा नेते यश (भैय्या)यांच्या हस्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब (अप्पा )घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लोणी गटाचे गटप्रमुख सुभाष शेठ वाळके, बाबासाहेब भिटे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष नितीन मिसाळ, युवा नेते सागर लाळगे, गणेश येरकळ, चंद्रकांत गुंड, संतोष गुंड, अशोक कुताळ, विलास शेळके, भरत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्तितीत पार पडला.यावेळी पुढे बोलताना यश भैय्या आजबे म्हणाले की युवकांनी राजकारणा मध्ये येणे महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये सर्वांनी आपला हक्क राजकारणाच्या माध्यमातून बजावला पाहिजे देशाचे भविष्य घडवण्याचे काम हे युवकांच्या हातामध्ये असून युवकांनी आत्तापासूनच आपल्या उज्वल भविष्यासाठी अजित दादा पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे शेवटी बोलताना यश भैया आजबे यांनी सांगितले. पिंपळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची शाखा स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबासाहेब भीटे यांनी पुढाकार घेऊन युवकांना संघटित करून पिंपळा येथे शाखा स्थापन केली आहे या कार्यक्रमासाठी गावातील अजिनाथ महाराज दिंडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश आरून, विठ्ठल खटके, कुंडलिक शेंडगे,अशोक भिटे, बाबासाहेब दिंडे, मधुकर शिंदे, दादा सुबे, सुखदेव आरून, लक्समन शेंडगे, उद्धव शेंडगे, दत्तू दुर्गे बबन भस्मे, रावसाहेब भस्मे, जयराम लोखंडे, जग्गनाथ आरून भाऊसाहेब शिंदे, उत्तम लोखंडे,संजय दुर्गे, शाखेचे अध्यक्ष शुभम लिंभोरे, उपाध्यक्ष प्रशांत भिटे तसेच अमोल लोखंडे, सचिन मेहेत्रे, तुषार लोखंडे, विनोद शिंदे, दीपक लोखंडे, बाबासाहेब लोखंडे, विकास आरून, रणजित खटके, बाळासाहेब अनफट, बाळासाहेब भिटे, सतीश शेळके, गणेश लोखंडे, अशोक काकडे, कार्यक्रमाचे उत्तम नियोजन बाबासाहेब भिटे व संतोष लिंभोरे यांनी केले.