सौताडा येथे लोकशाहीर साहित्यरत्न वंदनिय आण्णाभाऊ साठे जयंती ऊत्साहात साजरी
कुसळंब | अतुल शेलार
सालाबादाप्रमाणे याहि वर्षी सौताडा येथे लोकशाहीर साहित्यरत्न वंदनिय आण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. साठेनगर सौताडा याठिकाणी दि.7/8/2024 रोजी सकाळी 9 वा. लहुजी वस्ताद प्रतिष्ठाण व साठेनगरच्या वतीनं आण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.सायं. 4 वाजता ‘आण्णाभाऊंच्या समग्र साहित्याचा व जिवनकार्याचा लेखाजोखा’ हा व्याख्यान स्वरूप कार्यक्रम संपन्न झाला.साय. 5:30 वाजता आण्णाभाऊंच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी ऐतिहासिक मिरवणुक सौताडा नगरीतुन काढण्यात आली. व शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.मोठ्या ऊत्साहात हा सोहळा सौताडा येथे घेण्यात आला.प्रसंगी तरूण युवक,माता-बघिनी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.या सोहळ्यासाठी कृष्णा पुलावळे (अध्यक्ष) संतोष खंडागळे (ऊपध्यक्ष) अंकुश ढोबळे,लहु पुलावळे,अंकुश पुलावळे, बळीराम पुलावळे,काळू दा.पुलावळे,लक्ष्मण पां.पुलावळे, अमोल पुलावळे, सागर पुलावळे, चंद्रकांत पुलावळे, सतिष पुलावाळे, प्रविण ढोबळे,संदीप पुलावळे,हनुमंत खंडागळे,अनिल पुलावळे,शिवाजी ढोबळे,वैभव पुलावळे,अमर ढोबळे,चेतन ढोबळे,संतोष कै.पुलावळे, आबासाहेब पुलावळे,अमोल बा.पुलावळे व लहुजी वस्ताद प्रतिष्ठाणच्या सर्वांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.