★आमदार पंकजा मुंडे यांचे हस्ते जयंतीनिमित्त मूर्तीचे लोकार्पण
कुसळंब | प्रतिनिधी
सबंध देशाला सत्याचा मार्ग देणारे लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त एक ऑगस्ट रोजी विविध उपक्रमाचे आयोजन कुसळंब येथे करण्यात आले आहे. नवनिर्वाचित आमदार पंकजाताई मुंडे यांचा दौरा अचानक भगवान भक्तीगड कुसळंब मार्गे असल्याने त्यांच्या हस्ते आज सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सुरू असलेल्या उपक्रमाची सुरुवात ताईंच्या हस्ते करण्यात आली यानिमित्त सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीला अभिवादन करून जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. 1 ऑगस्ट रोज विविध उपक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये व्याख्यान, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, प्रबोधन, अन्नदान असे विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे, अशी माहिती सुद्धा आयोजकांकडून मिळाली आहे.
कुसळंब येथे आयोजित केलेल्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज मूर्तीची स्थापना करून त्याचे पूजन नवनिर्वाचित आमदार पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करून जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच सर्वांना पंकजाताईंनी शुभेच्छा देऊन अण्णाभाऊंचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करा असा संदेश देखील दिला.. तसेच उपस्थित मंडळींनी पंकजाताईंना आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन सत्कार केला यावेळी सोबत माझी जिल्हा परिषद सभापती महेंद्र तात्या गर्जे, पाटोदा नगरपंचायतचे सभापती किशोरजी आडागळे, आर पी आय तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र जावळे यांच्यासह कुसळंबचे ग्रामस्थ, नेते मंडळी, कार्यकर्ते, युवक वर्ग, महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★महेंद्र तात्या गर्जे, किशोरजी आडागळे, डॉ.नरेंद्र जावळे यांनी शब्द पाळला
काही महिन्यापूर्वी महेंद्र गर्जे, किशोर आडागळे, नरेंद्र जावळे यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की आम्हाला सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अण्णाभाऊंचा स्टॅच्यू भेट मिळावा आणि या मागणीला तिघांनीही होकार दिला आणि 29 जुलै रोजी अजून एक तिघांनीही आम्हाला मोठे सप्राईज दिलं ते म्हणजे स्टॅच्यू बरोबर जयंतीनिमित्त मूर्ती स्थापना करण्यासाठी पंकजाताईंना सुद्धा त्या ठिकाणी थांबून अभिवादन करून त्यात भर टाकल्याने तिघांचेही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही खूप खूप आभार व्यक्त करत आहोत…
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते कुसळंब.