खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त 54 वृक्ष लागवड – संतोष पवार, किरण डावकर
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार शेतकरी पुत्र आदरणीय मा. श्री. बजरंग बप्पा सोनवणे साहेब यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त 54 वृक्ष लावण्याचा संकल्प केला होता या अनुषंगाने युवा नेते संतोष पवार व सामाजिक कार्यकर्ता किरण डावकर यांनी अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करून एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे बीड जिल्ह्याच्या जनतेने बजरंग बाप्पाच्या रूपाने एक नवीन रोपट रुजवलं आहे आणि या रोपट्याचं रूपांतर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे होऊन बीड जिल्ह्याला सावली दिल्याशिवाय राहणार नाही या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये असे अनेक रोपटे तयार व्हावे यासाठी 54 वृक्ष लागवड करून बजरंग बाप्पाला शुभेच्छा वर्षाव केला आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते पाटोदा तालुका जिल्हा बीड व अंबळनेर सर्कल च्या वतीने व नाळवंडी सर्कल सर्कल बीड पुणे शहरांमध्ये करण्यात आलेला आहे झाडे लावताना माननीय खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे मित्र मंडळ पुणे शहर व सामाजिक कार्यकर्ते किरण दादा डावकर व बजरंग सोनवणे यांच्या अत्यंत जवळ चे निकटवर्तीय व कट्टर कार्यकर्ते व युवा नेते मा. श्री संतोष दादा पवार मित्रपरिवार उपस्थित होते.