श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळ्यासाठी शेतकरी गणेश शेकडे यांनी अडीच लाखांची बैलजोडी आणली.
आष्टी | प्रतिनिधी
स्वागतासाठी संपूर्ण गाव उपस्थित…
पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहा जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी, लाटेवाडी येथील गणेश शेकडे यांच्या बैलजोडीला यंदाचा पालखीचा मान मिळाला आहे. या वेळी गणेश शेकडे यांनी अडीच लाख रुपयांची बैलजोडी खरेदी केली. या बैलजोडीच्या शेकडे कुटुंबाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी उपस्थित सरपंच शिवा शेकडे, अंकुश महाजन, माजी सरपंच बुवासाहेब शेकडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब महाजन, ज्ञानेश्वर गिते, रावसाहेब ससाने, विष्णू महाजन, राम महाजन, अमोल आंधळे, रतन शेकडे, दत्तात्रय महाजन आदी ग्रामस्थ उपस्थित होते. महिला भगिनी यांच्या वतीने बैलजोडीचे औक्षण करण्यात आले. ६ जुलै रोजी पंढरपूरकडे पालखी प्रस्थान होणार आहे.